गाणं आमच्या मनीचे,
गूज तुमच्या मनीचे..!!
मैफल गटाचा हा पहिला मराठी केंद्रित सांगीतिक उपक्रम. या उपक्रमांतर्गत एक मराठी गीत दिले जाते, ते गीत ऐकून त्या गाण्याबद्दलचे येणारे भाव शब्दात व्यक्त करायचे आहेत.
आजसाठी गीत - एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
🔺डॉ. वृंदा कार्येकर
हे ऐकल्यावर वाटलं समोर तळं आहे बदकही आहेत . सारं कसं छान छान वाटतयं . ते पोहणारे बदकही सुंदर आहे . वरून कुरूप भासलं तरी . तरी काहीतरी निसटलयं . ते काय हे ऊमगत नाही . समजत नाही , धडपड चाललीये , तडफडतोय ,जीव नुसता मला निवांत राहूदे, एकांत हवाय. ही बदके पिल्ले काही ,कुणी सुध्दा नको . माझा मी कोण हा शोध घ्यायचाय .
मी ना ही हे बदक, मी नाही या बदकांमधला ,मी मी खरचं कोण? कळेल मला ? कधी ,कधी कळेल ? मी होई न आनंदी ? पुन्हा हेच तळे हेच पाणी तरीही वेगळं वाटेल मला हो नक्कीच वाटेल अरे हे कोण सांगतयं ? हे कोण बरं मी ?मी आणि मग हा कोण ? हा तर तळ्यात कधीतरी येणारा राजहंस ! तो ईथे कसा ? कशासाठी पण हे काय? त्या चा आवाज माझ्या सारखा ? छे मी स्वप्नात का जागायं ? वेडोबा ,तो तू आता मी आहे .पूर्ण रूपाांतरण झालेला राजहंस नुसता राजहंस नव्हे . कधीही कुणीही न पाहिलेला राजहंस .
🔺डॉ तृप्ती लोणकर
गाण शिकायला सुरवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा गुरुजींनी सांगितले.,"गाण म्हणजे केवळ सुरावट नाही"त्या सुरावटीतून लोकांपर्यंत. पोहोचायचे असेल तर गायच्याआधी गाण वाचायला शिक.
वय लहान होत.मनात म्हटले मला शाळेत वाचायला शिकवतात.पण पुढे कळले गाण्यातील भाव समजून वजनाने शब्द येणे म्हणजे गाणं वाचण
आज हा योग जुळून आला आहे.वर दिलेल्या ध्वनीफीतितील गाण. वरवर पाहता इंग्रजीतील "Ugly Duckling "या युरोपियन कथेच काव्यमय रुपांतर.
शब्दमहाप्रभू ग.दि.मांनी त्याच युरोपियन रूप पूर्णपणे नष्ट करून टाकले.त्यामुळे हे गाण तद्दन भारतीय मातीच बनले
तस पाहता या गीतातील अनुभव हा सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातील असतो.पण तो एका बदकाच्या रूपकातून आल्यामुळे आबालवृद्धांच्या भावविश्वाला हात घालतो.प्रत्येक जण सामान्य असला तरी त्याच्यातल्या असामान्यत्वाची जाणीव ज्या दिवशी त्याला होते तेव्हा तो राजहंस पदाला पोहोचतो.इतक साध सरळ तत्वज्ञान किती रसाळ शब्दात माणसा पर्यंत पोहचत.ही काव्याची आणि विशेषत्वाने कवीची ताकद आहे.
या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे.गीत असूनही त्याची कथा कथनाची ताकद.खरोखर रडणारे बदक,हळूच पाण्याच्या आरशात डोकावणारा बदक,जो तो त्याला रागावणारा तिकडे चालता हो म्हणणारा असे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर साकारले जातात.त्यातूनच ही संगीतमय कथा पुढे सरकते.आणि निराश मनाला उभारी देऊन जाते.
अशा पद्धतीने परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या माणसाला आशेचा किरण दिसतो.आपलेही दिवस पालटतील लोक आपल्यालाही मान्य करतील
अस हे माणसाला प्रोत्साहित आणि आश्वस्त करणार गाण मला फार फार भावत
🔺संजय गावडे
या गाण्याच्या संदर्भात एक छान अनुभव आहे तो इथे शेअर करतो... आमच्या कॅलेज मधे
२००८/०९ सली बी. फार्मसी ला एका मुंबईच्या मुलाने प्रवेश घेतलेला....अभ्यासात हुशार, त्यांच्या शाळेतून मल्लखांब मधे वरच्या दर्जापर्यंत बक्षीसं मिळवलेली....पण त्याचं आणि वर्गातल्या इतर मुलांचं फारसं पटत नसे.....त्याचं ऐकून घेणारा बहुदा मी एकमेव असेन....
महाविद्यालयाच्या परिसरात महादेव मंदिराच्या बाजुला मी संध्याकाळचा (वाॅकमॅन वर🎧) तास दिड तास गाणी ऐकत बसायचो...बाजुलाच विद्यार्थी वसतिगृह....
एक दिवशी हा माझ्याजवळ आला ..हेड फोन काढा म्हणाला.. आणि मला विचारतोय...सर मला कुणीच कसं जवळ घेत नाही... मी काय सांगतोय ते ऐकून समजून घेत नाही....काहीच कळत नाही...म्हणाला...
मी माझं वाॅकमॅन त्याच्या हातात दिलं.... आणि थांब आलोच म्हणून... वसतिगृहात माझ्या खोलीत जाऊन "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख" ही कॅसेट घेऊन आलो आणि हे गाणं ऐक आणि बघ काय सापडतं का!...
हे गाणं ऐकल्यावर त्याला त्या प्रश्नांची उत्तरं आपोआप....सापडली....
नंतर पदवी पूर्ण करताना चारही वर्षं काहीच अडचण आली नाही....
नंतर त्यांने मणिपाल ला मणिपाल विद्यापिठातून पद्व्यूत्तर पदवी घेऊन....
एका कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतोय....
तर ही आहे काव्य प्रतीभेची....
संगीता ची महती....
.
.
.
.
या विद्यार्थ्याचा कधितरी FB वर संपर्क होतो...
🔺सुरेश पाटील डोसे
वरपांगी कुरुप असणारे पिल्लु सर्वाहुन निराळं आहे. त्याला सोबतीला कोणी खेळू देईना, त्याला हसायचे त्यामुऴे ते दु;खी होवून स्वत:शीस रडे. सोबतचे न समजलेले भावंड ही विचारत नाही व हे दु;ख सांगायलाही कोणी नाही उलट त्याला चोचिने टोचून धाक दाखवत. असेच असामान्य माणसाची लक्षणे दिसून येतात . बाबासाहेब आंबेडकर असतील , किंवा अनेक थोर पुरुषांचाही समाजाने पहील्यांदा तिरस्कारच केला नंतर त्यांच्यातील असामान्य गुण पाहून त्यांना स्विकारले. पण पिल्लाला एके दिवशी स्वत;चीच प्रतिमा पाण्यात पाहतांना आपण बदक नसून राजहंस आहोत आणि या बदकांपेक्षाही आपण वेगळेअसल्याची जाणिव होते. सुरूवातीला चांगल्या माणसांना समाजातही असाच त्रास होतो पण नंतर मात्र ते चमकतातच.
गदिमांची एक सुंदर रचना आहे. बदक आणि राजहंस या दोन पक्षांची रुपकं वापरुन अप्रतिम रचना केली आहे.गाण्यातील कुरुप, वेडे, रंगे , भोळे , क्षणैक असे बरेच शब्द मनाला भावतात. लहान मुलांसाठी केलेलं हे बालगीत आहे
🔺अनिल नागेश ताम्हनकर
खरं तर हे बदकांमध्ये आलेलं पिलू कुरूप नाही. तो सुंदर राजहंसच आहे. पण लहानपणापासून बदकांबरोबर वाढलंय. त्याला वेगळेपणामुळे
इतर बदकांची पिले हिणवत आहेत कुरूप म्हणत आहेत.
एखादी गोष्ट वारंवार आपल्या कानावर पडलीक्षकी आपल्यालाही खरी वाटू लागते.
तशीच त्या छोट्या पिलाची अवस्था आहे. ते हिरमुसलंय.
पण जेव्हा त्याला आत्मशक्तीचे भान होते तेव्हा ते सर्वस्वी बदलून जाते.
आपलंही तसंच असतं.
आपले गुण जोपर्यंत कळत नाहीत तोपर्यंत आपणही लोक काय म्हणतात याचा विचार करतो. आपल्या शक्तिस्थानांची जाणीव होण्याचा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात पुढे मागे येतो. पण तो एक क्षणच आपला सारा नूरच बदलून टाकतो.
🔺दुष्यंत पाटील
'एका तळ्यात होती..' म्हणजे जगातल्या क्लिष्ट वास्तवाची सोप्या आणि काव्यमय भाषेत केलेली मांडणी मला वाटते..
गीत ऐकलं आणि एका डच चित्रकाराचं जीवन डोळ्यासमोरून तरळून गेलं.. काही राजहंसांची कधी ना कधी त्यांना स्वतःला आणि दुनियेला ओळख पटते. पण काही राजहंस या बदकांच्या दुनियेत स्वतःला शेवटपर्यंत शोधत राहतात.. आणि स्वत:ला शोधत शोधतच या जगाचा निरोप घेतात.. हा डच चित्रकार असाच दुर्दैवी राजहंस होता ज्याची ओळख शेवटपर्यंत कुणालाच समजली नाही.. त्याचं आयुष्य म्हणजे एक चाचपडण्याचा प्रवास होता..
वयाच्या २२ व्या वर्षी त्याची नोकरी गेली.. काही दिवस त्याने एका शाळेत बिनपगाराचे काम केले.. काकांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने धर्मशास्त्राशी संबंधित एका प्रवेश परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.. पण बहुतेक सगळा वेळ तो इकडं तिकडं भटकण्यात घालवायचा..काकांनी त्याला अभ्यास विसरायला सांगितलं.. आणि त्यानंही तो नाद सोडून दिला..
बेल्जीयममध्ये येऊन त्यानं खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांना धार्मिक उपदेश करण्याचं काम केलं.. आजारी लोकांना भेटून तो बायबलमधला उपदेश करायचा.. वैराग्यासारखा त्यानं सगळ्या गोष्टींचा त्याग केला.. पण तरीही त्याचं उपदेशक म्हणून असणारं काम गेलं.. आपल्या भावासोबतच्या पत्रव्यवहारात तो रेखाटनं पाठवायचा.. आता भावानं त्याला चित्रकार होण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला..
त्याच्या चित्रकार होण्याच्या निर्णयावर त्याचे आई-वडील अगदीच नाराज झाले.. त्यांच्या लेखी हे आयुष्यातले हे अपयश होते.. राजहंसाचा स्वत:च्या ओळखीचा संघर्ष चालूच राहिला..
थोडक्यात सांगायचे तर धाकट्या भावाने दिलेल्या आर्थिक पाठबळावर तो शिकत राहिला.. पुढे चित्रकार म्हणून त्यानं बराच संघर्ष केला.. पण बदकांच्या दुनियेत त्याला भयानक अपयश आलं.. अखंड आयुष्यात त्याचं एकच चित्र विकलं गेलं.. पुढे त्याला वेडाचे झटके येऊ लागले.. त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आलं.. आणि शेवटी त्यानं आत्महत्या केली..
शेवटपर्यंत या राजहंसाची ओळख कुणाला नाही.. तो वैफल्यमय आयुष्य जगला.. त्याची शैली वेगळी होती..
आज त्याच्या चित्रांच्या किंमती अर्थातच कोटींच्या घरात आहेत..
पण बदकांच्या जगात हा राजहंस मात्र चाचपडत राहीला.. त्याच्या प्रतिभेचे सौंदर्य कुणाला दिसलेच नाही.. तो शेवटपर्यंत 'कुरूप पिल्लू'च राहिला. पण या राजहंसाला वगळून modern artची सुरुवात होऊच शकत नाही..!!
( वॅन गॉग)
🔺डॉ.श्रीपाद गोखले
अगदी समजायला लागल्यापासून हे गाणं ऐकलं आहे.तरीही तीच अवीट गोडी त्यात सामावली आहे असा अनुभव दर वेळी येतोच.
मूळ कथा ही तितकीच उत्कट आणि नंतर हे गाणं घडवणारे, साक्षात परमेश्र्वराचे अवतारच जणू....
गदिमा, खळे काका आणि आशा ताई!
एकदम सरळ साधे शब्द आणि सोपी भाषा वापरून निर्माण केलेला अर्थपूर्ण काव्यरस !
अजूनही मी ते वेडे पिल्लूच आहे असे ऐकताना वाटते. खरंच किती जणांना आपण आता राजहंस झालोय असं समजतं किंवा वाटतं कोण जाणे?
तरीही मी पण काही तरी वेगळा आहे, नक्की मला यश मिळेल, असं वाटणारे प्रसंग बहुधा प्रत्येकाला अनुभवायला मिळतात....
आणि आयुष्य चालू राहते.....
दत्तात्रय राजगुरू
एक तळ्यात होती.......
एक असा मुलगा ज्याला नेहमी चिंता वाटते की लोक काय बोलतील?..
आणि त्यामुळे तो नेहमीच स्वतःला कमी लेखू लागला.
त्याच्याकडे खूप खूप सामर्थ्य होतं, तो इतरांपेक्षा वेगळा होत,
पण हे त्याला समजतच नव्हतं कारण तो दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे वागत होता..
आणि त्यामुळे तो सामान्य राहिला..
व जेव्हा त्याला स्वतःची खरी ओळख पटली तेव्हा मात्र तो थांबला नाही.
त्याने ठरवलं जग जिंकायचं..
करण त्याला त्याच्या सामर्थ्याची ओळख पटली होती..
त्याला समजलं होत की मी वेगळा आहे.
मला असं राहायचं नाही.
आणि त्याने त्या छोट्या जागेला सोडलं.. आणि निघाला दूरच्या प्रवासाला..
तो एक राजहंस होता..
बदकासारखं तळ्यात राहून तळ्यातच संपून जाणं त्याला मान्य नव्हतं त्याला ..
सहभागी सदस्यांचे आभार!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मैफल
No comments:
Post a Comment