Thursday, May 17, 2018

राग आमच्या मनीचा, गाणे तुमच्या मनीचे

राग आमच्या मनीचा, गाणे तुमच्या मनीचे

🔻 तृप्ती लोणकर

राग आमच्या मनीचा
गीत तुमच्या आवडीचे..

मैफल गटाचा हा मराठी केंद्रित सांगीतिक उपक्रम. या उपक्रमांतर्गत आम्ही तुम्हाला एका रागाची  माहिती देऊ, ती वाचून तुम्ही त्या रागाचे एकच मराठी गाणे पोस्ट करायचे.ते नसेल तर बंदिश अथवा चीज तुम्ही टंकित करून पोस्ट करा.   आॅडीओ असेल तर पोस्ट करा.
 
तर मग तयार आहात ना?  
 
आजचा राग   "भूप"
 
आरोह.   सा रे ग प ध सा
अवरोह.   सा ध प ग रे सा
हा राग कल्याण थाटातील आहे. त्याचे सर्व स्वर शुद्ध आहेत.
वादी स्वर. गंधार (ग)आहे.
संवादीस्वर धैवत (ध ) आहे
हा राग.   रात्रीच्या प्रथम प्रहरी गायला जातो.
 
वरील माहिती वाचा आणि त्यावर आधारित गाण्याची एकच  क्लिप पोस्ट  करा...
 
🔻विद्याधर शुक्ल
 
"घनश्याम सुंदरा श्रीधरा" ही शाहीर होनाजी बाळा यांची खरोखरीच अमर भूपाळी    त्याच नावाच्या चित्रपटात   आहे . पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात . संगीताचा साज   वसंत देसाई  यानी चढवला आहे.
 
🔻प्रीती कामत
 
'धुंद मधुमती रात रे नाथ रे' ह्या किचकवध चित्रपटातील सुमधुर गाण्याची चाल मा. कृष्णरावांनी भूप रागावर बांधली आहे. गीतकार: ग. दि. माडगुळकर, गायिका: लता मंगेशकर
 
🔻  सुधांशुनूलकर
भूप राग म्हटला की पहिलं गाणं माझ्या मनात चटकन येतं, ते म्हणजे 'माझे जीवन गाणे' आणि पं. अभिषेकीबुवांचा आवाजातलं हे गीत मनात आपोआपच रुंजी घालतं.
या गाण्याची ऑडिओ क्लिप मात्र माझ्याकडे नाही.
 
🔻 तृप्ती लोणकर
 
भूप रागात
गंधार.    वादी
धैवत.    संवादी आहे
       ग प ग रे  सा रे ध सा ग-ग रे        ग पध
या ओळीत ग चा वापर जास्त वेळा झाला आहे.कारण ग हा वादी म्हणजे मुख्य स्वर आहे.भूपाचा राग विस्तार करताना शुद्ध गंधार वापरतात.
            तर ध म्हणजे धैवत हा स्वर ग च्या तुलनेत कमी वेळा आला  म्हणजे साधारण सहा स्वरांचे नंतर आला आहे.ध हा हेखील राग विस्तारात महत्वाचा आहे.पण तो ग इतका मोठा नाही
ग ध या दोन स्वरांनी रागाचे अंग प्रकट होते. म्हणून भूपात ग सरळ लावतात तर ध वर थोडी मिंड येते
 
 

Thursday, April 19, 2018

हायकू

घंटा वाजली
गात्रे किणकिणली
सूर समाधी
**** **** **** **** **** **** **** 
नदीचा काठ
आठवणींचा तास
युगानुयुगे
**** **** **** **** **** **** ****
नदीची ओढ
चित्ताची धडपड
गुदमरलो
**** **** **** **** **** **** *** **** 
पक्षी उडाले
डोंगररांगा शांत
निजले मन
**** **** **** **** *** **** **** ****
पहाट झाली
कोंबडा आरवला
दिवस सुरू
**** **** **** **** **** **** **** ****
आभाळ गाणे
प्रृथ्वीवर सांडले
हिरवा रंग
**** **** **** **** **** **** **** ****
अश्रू दाटले
पानगळीचा ऋतू
ओली दुपार
**** **** **** ***** **** **** **** ****
सुसंवेदना
कोलाहल मिटला
आनंद झाला
**** **** **** ***** **** **** **** ****
शिशिर थंडी
अंगात हुडहुडी
शाल ओढली
**** **** ***** **** **** **** **** ****
अरे सरड्या
रंग बदलू नको
फसशील तू

©वि.रा.बेंबळकर.

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

आकाशी झेप घे रे

🔻 अंजली टक्के

हे गाणे ऐकले की वडिलांची आठवण येते . ते नेहमी हे गाणे शिकवायचे .

की आकाशात झेप घ्यायला शिका. आई बाबाच्या लाडात अडकून पडू नका .

दुसरी आठवण त्या picture चीच येते . रवींद्र महाजनी आणि त्याचे शिक्षक . 

शिक्षक असावे तर असे असे नेहमी वाटायचे. 

हे गाणे ऐकताना लहानपणीच्या शिक्षकांची  नेहमीच आठवण येते आनि कृताज्ञेने मन भरून येते .

जसजसे वय वाढले तसे आणि  धकाधकीच्या  आयुष्यात मार्ग काढताना या गाण्याने नेहमीच पाठीवर हात ठेवला आहे .

अगदी कुसुमाग्रजांच्या , तुम्ही फक्त लढ म्हणा ....या कविते इतकीच या गाण्याने साथ दिली आहे.

सोडी सोन्याचा पिंजरा या वाक्याने मळलेली वाट सोडून हवी ती वाट चालायच्या इच्छेला बळकटी दिली.
नोकरीचे रसाळ फळ नाही खावेसे वाटले.

घराचा अर्थ सामाजिक बंधन आणि रुळलेल्या वाटा घेतला आणि त्या तोडायची उर्मी प्रबळ व्हायची .

पंख दिले देवाने ...ऐकतां वडीलानी मनावर बिंबवलेले उतिष्ठत जाग्रत प्राप्य वरांन्नी बोधत ...हे वाक्य मनात निनादत .ते त्यांनी भिंतीवर उंच लिहून ठेवले होते आणि आमच्याकडून पाठ करून घेतले होते.

आणि मग नवीन वाट चालू पडल्यावर, दमून भागून कोलमडताना, कष्टाविन फळ का मिळते याचा अर्थ अनुभवला.

पुन्हा पुन्हा हे गाणे ऐकताना , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या गाण्याने साथ दिली तसेच   अधिकाधिक समजत गेले.

आयुष्य जगायची उमेद वाढवत गेले .

कळते परी ना वळते हे तर ब्रिजवाक्य आहे . कळते सगळ्यांनाच , पण वळणे कठीण . हे वळवून घेताना काय कठीण हे अनुभवल्याशिवाय नाहीच समजत .

आणि जेंव्हा एक टप्पा गाठला तेंव्हा शेवटच्या वाक्याचा अर्थ मनात भरला आणि कोणी पाठीवर हात ठेवल्यासारखेच शब्द आहेत ते.

घामातून मोती मिळाले, घर प्रसन्नतेने नटले आणि वडिलांनी कौतुकाचे दोनच शब्द काढले पण आयुष्य भरून पावले.

खरतर या गाण्यामधील प्रत्येक शब्दावर आयुष्यात लिहिण्यासारखे खूप काही आहे .

आणि गाण्याची चाल अभंगासारखी आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकले तरी कंटाळा येत नाही .
 
फार आशयपूर्ण गाणे .

🌕🌞🌥🌨💦☔🌊🌿🍀🍂🍁🌾💐🌷🌹🌼🌼🌼
 
🔻 दुष्यन्त पाटील
 
माणूस म्हणजे खरंच अजब चीज आहे.. त्याच्या आत किती क्षमता दडलेल्या आहेत ते कुणालाच सांगता येत नाही.. गंमत म्हणजे माणसाला त्याचं बाह्यमन सुखाच्या आरामाच्या मागं धावायला सांगतं. आणि एकदा का माणूस सुखाच्या, ऐषआरामात अडकला की त्याच्या आतल्या लपलेल्या क्षमता लपुनच राहतात, त्या बाहेर पडत नाहीत.. सुखाची, आरामाची, विलासाची ओढ आणि माणसाचा खरा आनंद ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत आणि हे सत्य समजायला काहीसं कठीण आहे.. माणसाचा खरा आनंद त्याच्या आत लपलेल्या प्रचंड क्षमतांना वाट देऊन मोकळं करण्यात आहे..

जीवनातलं समजायला कठीण असणारं क्लिष्ट असं तत्वज्ञान रुपकं, उपमा वापरून ही कवी मंडळी सांगतात.. वर सांगितलेलं क्लिष्ट तत्वज्ञान ह्या गाण्यात सोपं करून सांगितलयं..

‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’

जीवन आकाशासारखं अफाट आहे, आणि त्यात पाखरासारखी उंच झेप घेण्याची क्षमता माणसामध्ये आहे.. पण त्यासाठी सुख आणि विलासाच्या वर वर आकर्षक वाटणाऱ्या सोनेरी पिंजऱ्यातून माणसाला बाहेर पडायला हवं.. तत्वज्ञान, जीवनातलं कठीण तत्वज्ञान सोपं करून सांगण्याची किती छान पद्धत !!

‘तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते  खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा’

चित्रपटातल्या नायकाला वडिलांनी कमावलेली संपत्ती आयतीच मिळते.. आणि  तो ऐशआरामाच्या जाळ्यात अडकतो.. 'सुखलोलुप झाली काया' ह्या शब्दांत त्याचं छान वर्णन केलंय.. पण वडिलांनी कमावलेल्या संपत्तीच्या आसऱ्यात किती दिवस राहायचं?

‘घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा’

ज्या महालामध्ये माणूस माणसाचं खरं स्वरूप, त्याची खरी क्षमता कायमची बंदी होते तो महाल म्हणजे तुरुंगासारखा आहे.. अशा महालात मिळणारी सारी पंचपक्वानंही विषासमान आहेत.. माणसाची सुखाची, ऐषआरामाची असणारी ओढ त्याला ह्या महालातून बाहेर पडू देत नाही..

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा’

निसर्गानं माणसाला प्रचंड क्षमता दिल्या आहेत.. या क्षमतांची एकदा का त्याला जाणीव झाली की त्याला कुणीच, काहीच अडवू शकत नाही.. एक एक सीमा पार करत तो एखाद्या अथांग ठिकाणी येऊन पोहोचतो..

‘कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा’

सुखाचा सोनेरी पिंजरा सोडून बाहेर जगात झेप घेताना पंख वापरून कष्ट घ्यावे लागतील.. पण जन्मभर पिंजऱ्यात असणाऱ्या पाखराला झेप घेण्याची कल्पना अनुभव नसल्यानं कावरी बावरी करते..

‘घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा’

स्वत:च्या क्षमतांचा वापर करून काहीतरी मिळवणं हा एक अनुभव असतो.. नुसत्याच सुख-विलासातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप उच्च दर्जाचा आनंद हा अनुभव आपल्याला देऊन जातो.. त्यातून मिळणारे समाधान, येणारी प्रसन्नता दैवी असते.. 

क्लिष्ट, खोल तत्वज्ञान कुणालाच न समजणाऱ्या क्लिष्ट भाषेत अचूक सांगणं सोपं असतं.. आणि उथळ गोष्टी सर्वांना समजतील अशा सोप्या शब्दांत सांगायला सोप्या असतात.. पण क्लिष्ट तत्वज्ञान सर्वांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत सांगणं ही मात्र अवघड कला आहे.. अशी जुनी मराठी गाणी ऐकताना ह्या कलेचा आविष्कार मला दिसतो आणि मी स्तिमित होतो...

श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा’

स्वत:च्या क्षमतांचा वापर करून काहीतरी मिळवणं हा एक अनुभव असतो.. नुसत्याच सुख-विलासातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप उच्च दर्जाचा आनंद हा अनुभव आपल्याला देऊन जातो.. त्यातून मिळणारे समाधान, येणारी प्रसन्नता दैवी असते.. 

क्लिष्ट, खोल तत्वज्ञान कुणालाच न समजणाऱ्या क्लिष्ट भाषेत अचूक सांगणं सोपं असतं.. आणि उथळ गोष्टी सर्वांना समजतील अशा सोप्या शब्दांत सांगायला सोप्या असतात.. पण क्लिष्ट तत्वज्ञान सर्वांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत सांगणं ही मात्र अवघड कला आहे.. अशी जुनी मराठी गाणी ऐकताना ह्या कलेचा आविष्कार मला दिसतो आणि मी स्तिमित होतो...

🔻 अनिल ताम्हणकर

हा संदेश सर्व तरुणाईला साध्या सोप्या शब्दात कवीने दिला आहे
साधीसोपी चाल, अर्थपूरक प्रवाही संगीत आणि आवाजाला तर तोड नाही.
कोणत्याही गाण्याला किंवा काव्याला सामान्य लोकांच्या ह्र्दयामध्ये स्थान प्राप्त करणाऱ्या गोष्टींचा या गीतामध्ये समसमा संयोग झाला आहे.
या गीतामुळे खूप पिढ्या भारावून गेल्या. अगदी तल्लीन होऊन गेल्या.
आपल्या घरात, आपल्या नातूवाईकांच्या बरोबर सुखासमाधानात राहणारा तरूण निष्क्रीय होऊन जातो.
आपल्या सामर्थ्याची त्याला कल्पना देखील येत नाही आपल्या ठायी असणाऱ्या गुणांचा उपयोग स्वतःसाठी किंवा समाजासाठी कलता येईल हेही तो विसरतो.
आपण तर सामान्य माणसे.
पण प्रत्यक्ष वीर हनुमानालादेखील त्याच्या क्षमतांचा विसर पडला होता.
परंतु एकदा जाणीवा जाग्रुत झाल्यावर काय होतं ते आपण रामायणात पाहिले/ऐकले आहे.
या गीतातील प्यत्येक कडवे हे जाग्रुती निर्माण करणारे आहे.
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा
कवी सांगतोय तू जो ऐशारामात लोळत आहेस ते सोड आणि आकाशात भरारी घे.
सारं अवकाश तुला कवेत घेण्यासाठी तयार आहे, हा पिंजरा सोडून तू बाहेर पड दिग्विजयासाठी.वैभवाचा त्याग कर आणि अल्पसंतुष्टता सोड.
तू माझं घर, माझी माणसं असे करत राहिलास तर तुझी उन्नती हैणार नाही त्याग कर सर्व सहज साध्य गोष्टींचा.
तुज पंख दिले देवाने,कर विहार सामर्थ्याने
गरुडाला देखील आपल्या पंखांतील  सामर्थ्य काय आहे ते समजण्यासाठी आकाशात भरारी घ्यायला लागते
तू आपल्या सामर्थ्यावर जे यश प्राप्त करशील त्याची गोडी ही ऐदीपणाने मिळालेल्या सुखभोगांपेक्षा कितीतरी पटीने 
मोठी असेल.
खरोखरीच असे प्रेरणादायक 
गीत संयोजकांनी सादर केले त्यांना धन्यवाद.
त्रुप्तीताई योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात ते काही खोटे नाही

🔻 वृषाली गोखले

याला जीवन ऐसे नांव!
आमची आजी
म्हणायची की,
नोकर म्हणून राबावे,
मालक बनून भोगावे,
आणि आमच्या आईनेही हेच बिंबवले आमच्या मनावर!
आयुष्य उघड्या डोळ्यांनी पहायचं म्हणजे,प्रत्यक्ष मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही,
जीवनाची शाश्वत मूल्ये मनांत रुजण्यासाठी वैभव,खोटी प्रतिष्ठा,
श्रीमंती उपयोगी ठरत नाही,
अपमान सोसावे लागतात,तेव्हांच सन्मान मिळतो
आराम हराम आहे या सिनेमातील, हा नायक अति श्रीमंत आहे,पण त्याला ते सर्व वैभव उपभोगायला मिळते आहे,त्यांत त्याचे कष्ट नाहीत की कसले कर्तुत्वही नाही.
घर कसले ही तर कारा (तुरुंग)बनली आहे जणु त्याच्यासाठी...
सगळी संपत्ती जणु विषच बनलंय त्याच्यासाठी..
कारण फुकट मिळालेल्या पैशातून त्याची व्यसने वाढली आहेत,स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही..
असतील शिते,सर जमतील भुते हेच त्याचे जीवन बनले आहे,केवळ त्याच्या पैशाकडे बघून,त्याच्या भोवती,मित्र~मैत्रिणींचा गोतावळा आहे.. पण कटु सत्याची जाणीव,त्याचे मास्तर त्याला करून देतात.
ते त्याला कडक शब्दांत,
आकाशी झेप घे रे पाखरा...सोडी सोन्याचा पिंजरा...
""मोहाचे हे बंधन तोड"" असे सांगतात,कवी जगदीश खेबुडकरांनी फार सुंदर शब्द रचना केलीये,ते म्हणतात, तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरि डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनिया सरिता सागरा..
सोडी सोन्याचा पिंजरा
...सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला पक्षी हे, समर्पक प्रतीक वापरून,जीवनाच्या अथांग अवकाशात 
श्रमप्रतिष्ठा मिळवायला निघालेला नायक आणि त्याला डोळस मायेने समजावून सांगणारे मास्तर..ते मनांत ठसते.
फुकटचा आराम व आळस याने आयुष्यात  दैन्यावस्था येते..तर मग अशा कष्टाविण मिळालेल्या संपत्तीत लोळत राहून सुखलोलुप होण्यापेक्षा,घराचा उंबरठा ओलांडून बाहेरचे जग बघ.जगाची पारख करून शहाणा हो,अशी प्रेरणा ते मास्तर ,नायकाला देतात.
आणि मग.. नायकाच्या मनांत अपरिवर्तनीय परिवर्तन घडते नि ते प्रत्यक्ष जीवनात ते अवतरते...!
!...मग आनंदी आनंदच...!
एक तळमळीचे,कडक तरीही प्रेमळ आणि  आपला विद्यार्थी  चांगला घडावा, यासाठी व्यथित असलेले शिक्षक देवपूजेस बसलेत व प्रार्थना म्हणून जे गीत गातात,त्यातून हाच संदेश आहे की,
 आराम हराम आहे, कष्टाचेच फळ मधुर आहे...
'घामातून मोती फुलले'
'श्रमदेव घरी अवतरले'
'घर प्रसन्नतेने नटले'
'हा योग जीवनी आला साजिरा!'

ह्या गीताचे शब्द,चित्रपटाच्या दृश्य माध्यमाचा सुरेख वापर आणि रवींद्र महाजनी यांचा सहज सुंदर अभिनय,यामुळे या गाण्याचे अपेक्षित संस्कार मनावर होतातच.
 
🔻 संजय गावडे
 
१९६० च्या दरम्यान...'ते माझे घर' या चित्रपटासाठी गीतकार रवींद्र भट यांनी 'श्रमिक हो घ्या इथे विश्रांती' हे गीत लिहिले.... बाबुजींनी स्वत: संगीत देऊन स्वत:च हे गीत गायलंय...
१९६० म्हणजे भारत कृषीप्रधान देश होता... श्रमप्रधान देश होता..
तेच माझे घर ही संकल्पना आहे...
आणि हे घर म्हणजे मानवतेचे मंदिर आहे... आणि या मानवतेच्या मंदिरात स्थिरावण्यासाठी विनंती केली जात आहे.
इथे विश्रांती घ्या असे श्रमिकांना आवाहन करण्यात येत आहे.
हे जे मंदिर आहे ते समतेचे बंधुत्वाचे आहे...
इथे देव हा पाषाणाचा नसून प्रत्तेकाच्या अंतरात्म्यात वसलेला आहे.
अशा या मंदिरात श्रमिक हो विश्रांती घ्या...
श्रमिकांकडे आर्थिक सुबत्ता नाही....तरी ते परमेश्वराचे लाडके आहेत कारण यांच्या तोंडी मानवतेचे अभंग आहेत आणि हीच मानवता त्यांना कितीही कष्ट पडले यातना झाल्या तरी त्याची विस्मृति घडऊन आणतात...
हे मंदिर म्हणजे संतांनी जी समानतेची भागवत धर्माची पताका रोवली तेच आहे..
इथे उच्चनीचता नाही , जातीभेद नाही..या मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत...मानवता या एकाच छताखाली असलेलं हे घर मंदिरा समान आहे...श्रमिकहो घ्या इथे विश्रांती...
असं हे मानवतेचं महत्त्व सांगणारं गीत लहानपणी दुरदर्शन वर प्रथम पाहीलेलं‌.‌...नंतर अनेक वेळा ऐकलंही... आणि ज्या ज्या वेळी ते ऐकू तेव्हा मानवतेच्या शिकवणीची स्मृती देतच राहीलं...
 

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

Western संगीत रसग्रहण

🌹रसग्रहणाची पूर्वतयारी  🌹

आपण संगीताकडं थोड्याशा वेगळ्या नजरेनं पाहू. समजा की आपल्याकडं चारंच ओळींचं संगीत आहे. काही सेकंदातच ते संपून जातं. त्या संगीतात आपल्या बुडण्याचा अनुभव येईल का? बहुतेक नाही - कारण पूर्णपणे रंगवण्याचा आधीच ते संपून जाईल.

आता कल्पना करा की आपल्याला त्यात काही अजून संगीत टाकायचे आहे. आपण कुठलेतरी वेगळेच संगीत उचलून त्या मूळच्या संगीतात टाकले तर काय होईल? ते भरकटल्यासारखं होईल. ते अगदीच विसंगत होईल. संगीत रंगण्याचं सोडाच, आहे ते संगीत बेरंग होऊन जाईल !!

आता कल्पना नवीन संगीत टाकल्यानं विसंगती यायला नको म्हणून आपण आहे तेच संगीत पुन्हा टाकलं तर काय होईल? तेच तेच संगीत आल्यानं श्रोता कंटाळून जाईल..

थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण वेगळंच संगीत टाकलं तर भरकटल्यासारखं होईल आणि तेच संगीत टाकलं तर श्रोता कंटाळून जाईल..  याचा अर्थ असा की आपल्याला जे संगीत आपल्या रचनेमध्ये टाकायचं आहे ते एक प्रकारे वेगळंही (= विविधता) असायला  हवं (म्हणजे ऐकणाऱ्याला कंटाळा येणार नाही) आणि त्याचा मूळ संगीताशी संबंध (= एकता) असायला हवा (म्हणजे श्रोता भरकटला जाणार नाही.)

हे काहीसं कवितेसारखं आहे.. कवितेत बरीचशी कडवी येतात.. त्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात.. पण तरीही कवितेच्या मूळ थीमशी ती सारी कडवी संबंधित असतात..

ही विविधता आणि एकता एकत्र आणण्यासाठी पाश्च्यात्त संगीतकार काही तंत्रं वापरताना दिसतात.

१)      आपण कॅनन हा संगीताचा प्रकार बघितला. कॅनन हा अगदीच विशिष्ट प्रकार झाला पण पोलीफोनिक संगीतात बरेचशे आवाज एकच थीम वेगवेगळ्या वेळी गाऊ शकतात. आवाज वेगवेगळे असल्यानं आणि ते वेगवेगळ्या वेळी आल्यानं विविधता येते तर थीम एकच असल्यानं एकता येते. फ्युग नावाच्या संगीत प्रकारात नेमकं हेच तंत्र वापरतात. यात एकामागोमाग एक वेगवेगळे आवाज येतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या  वेगवेगळ्या वेळी एकच थीम आणतात. नंतर ते संगीत स्वतंत्रपणे फुलवत  नेतात. आपण थोड्या वेळातच फयुगचं उदाहरण बघू.


२) एकच थीम एका पट्टीत वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पट्टीत वाजणं. यात जागा बदलल्यानं विविधता येते तर तीच थीम वाजल्यानं एकता येते.  कालच्या कारमेन ह्या सांगीतिकेमधल्या संगीत रचनेत हेच वापरलं होतं.

3) एक थीम झाल्यावर दुसरी विसंगत थीम वाजवणं (यामुळं विविधता येते) आणि मग पुन्हा मुळची थीम येणं (यामुळं एकता येते).

ह्या गोष्टींचा वापर करून संगीतकार रचना रंगवत जातात. आपल्याला ह्या तत्वांचा उपयोग संगीताचे फॉर्म्स समजून घ्यायला होईल. आपण उद्यापासून संगीताचे फॉर्म्स बघूया.

शुभ रात्री
🌹
 
  • बायनरी फॉर्म
 
आज आपण स्कारलाट्टीचा तोच सोनाटा थोडासा अजून जवळून पाहू.. त्याच सोनाटाचे त्याच वादकानं वाजवलेलं दुसरं रेकॉर्डिंग आपण संदर्भ म्हणून घेऊ. आपण खालील रेकॉर्डिंग बघूया :


स्कारलाट्टीचा हा सोनाटा अगदी मेलोडियस आहे.. (म्हणजे त्यातली मेलडी अगदी प्रकर्षानं अनुभवयाला येते).. संगीताची ही बाजू (मेलडीप्रधानता) ही आपल्या संगीताशी अगदी जुळणारी.. त्यामुळं हे संगीत नक्कीच आपलंच असल्यासारखं वाटतं.. पण एकच छोटासा फरक आहे..

आपण ह्या रचनेचा फॉर्म आधी थोडासा जवळून बघू आणि मग फरकाकडे वळू..

ह्या रचनेचा फॉर्म आहे बायनरी फॉर्म.. संगीताला सुरुवात ००:३२ ह्या वेळी होते.. पहिली थिम ००:३२ ह्या वेळी E (म्हणजे पांढरी ३) ह्या पट्टीत सुरु होते. सर्वसाधारण ००:५२ च्या दरम्यान दुसऱ्या पट्टीकडं वाटचाल सुरु होते.. ०१:१६ ह्या वेळी दुसरी थीम वेगळ्या पट्टीत (B म्हणजे पांढरी ७) सुरु होते.. ०२:०६ ह्या वेळी दुसरी थीम पांढरी ७ वर येऊन (संपून) स्थिरावते.. ह्या ठिकाणी आपल्या बायनरी फॉर्म मधला अ हा भाग संपतो..

बायनरी फॉर्म मधला ब हा भाग ०२:०८ ला सुरु होतो.. बायनरी फॉर्मचं वैशिष्ट्य असतं की ब हा भाग वेगवेगळ्या पट्ट्यांमधून फिरत फिरत येऊन मूळच्या पट्टीत संपतो.. ह्या रेकॉर्डिंग मध्ये ब हा भाग ०३:३८ ला मूळच्या पट्टीत येऊन संपतो..

आपल्या संगीतात न आढळणारा भाग म्हणजे यातला ब हा भाग. ब ह्या भागात रचना वेगवेगळ्या पट्टयांमधून फिरत येते शेवटी मूळच्या पट्टीत (पांढरी ३) संपते. पट्टी पुन्हा पुन्हा बदलणं हा प्रकार पाश्च्यात्त अभिजात संगीतात ठराविक ठिकाणी येतो. (उदा बायनरी फॉर्म मध्ये तो ब मध्ये येतो) माझ्या माहितीप्रमाणं हा प्रकार आपल्याकडं आढळत नाही.. 

फक्त माहितीकरिता - ३०० वर्षांपूर्वीच्या ह्या संगीतकारानं साडेपाचशेपेक्षा जास्त सोनाटा रचले आणि ते अजूनही लोकांना आवडतात..
 
  • 🌹 साधा टर्नरी फॉर्म 🌹
 
साध्या टर्नरी फॉर्म मधली रचना अ-ब-अ किंवा अ-ब-अ१ अशी असते. यातल्या अ आणि ब या एका प्रकारे स्वयंपूर्ण रचना असतात. म्हणजे अ च्या शेवटी संगीत संपल्याची जाणीव होते.. ब च्या शेवटी ब चे संगीत संपल्याची जाणीव होते. अ आणि ब हे शक्यतो वेगवेगळ्या पट्टीत असतात. ब हा नेहमीच अ शी विसंगत असतो.. शेवटला पुन्हा येणारा अ हा कधी कधी मूळच्या अ पेक्षा किंचितसा अलंकारिक असू शकतो म्हणून त्याला अ१ असंही दाखवलं जातं.
 
हे अ आणि ब हे रिपीट होऊ शकतात. म्हणजे अ-अ-ब-ब-अ.
 
ही ढोबळ्मानानं सांगितलेली टर्नरी फॉर्मची रचना आहे. आपण काही उदाहरणं पाहू.. त्यातून टर्नरी फॉर्मची संकल्पना अजून स्पष्ट होईल..
 
रोमँटिक कालखंडातील एक जगप्रसिद्ध रशियन संगीतकार म्हणजे चेकॉव्हस्की. त्याने फक्त पियानोसाठी केलेल्या (वर्षातल्या प्रत्येक महिन्यासाठी एक अशा एकूण १२) the seasons ह्या रचना प्रसिद्ध आहेत. त्यातली जून ही रचना पाहू.. 
 
या रचनेला त्यानं  barcarolle  असं नाव दिलंय.. barcarolle चा अर्थ होतो नाविकाने गायच्या गीताप्रमाणं असणारी रचना. (व्हेनिस शहरातले नाविक नाव वल्हवताना संथ गतीने गातात त्याची लय वल्हवण्याशी जुळते. barcarolle म्हणजे अशाच शैलीतली रचना)
 
 
सुरुवात - ०२:१७  - अ 
०२:१७  - ०३:०५ - ब
०३:०६  - शेवट   - अ
 
रचनेच्या शेवटाला खास शेवट करणारा तुकडा आहे..
 
थिअरीचं एकवेळ जाऊ द्या, तुम्हाला हे संगीत ऐकायला कसं वाटतं ते सांगा. इतर पाश्चात्त्य अभिजात संगीतासारखं हेही संगीत इअरफोन लावूनच ऐका..
  • टर्नरी फॉर्म
बायनरी फॉर्म नंतरचा फॉर्म म्हणजे टर्नरी फॉर्म. तो आपण लवकरच बघू.

बायनरी फॉर्म अ-अ-ब-ब असा असतो तर टर्नरी फॉर्म अ-ब-अ असा असतो. बायनरी फॉर्म मध्ये ब चा शेवट गाण्याच्या/संगीताच्या अशा स्वरावर येऊन थांबतो की गाणं/संगीत संपल्याची आपल्याला जाणीव होते.

टर्नरीमध्ये 'अ' हे संगीत येते, मग विसंगत असणारे 'ब' हे संगीत येते. आणि शेवटी पुन्हा एकदा 'अ' हे संगीत येते. 'अ' च्या शेवटी आपल्याला संगीत संपल्याची जाणीव होते.

twinkle twinkle चं संगीत टर्नरी फॉर्म मध्ये आहे..

A Twinkle, twinkle little star, how I wonder what you are.
B Up above the world so high, like a diamond in the sky.
A Twinkle, twinkle little star, how I wonder what you are. 

twinkle twinkle हे बायनरी फॉर्ममध्ये असल्याचा उल्लेख मला फक्त विकिपीडियावर दिसला.. पण तो वेगळ्या विषयावरचा मुद्दा आहे.. त्यांनी दिलंय त्याप्रमाणं तो शाब्दिक पातळीवरचा फॉर्म आहे सांगीतिक पातळीवरचा नव्हे..

मला वाटतं की आता सर्वांना टर्नरी फॉर्मची कल्पना आलीच असेल.. आज आपण ह्या फॉर्ममधल्या काही रचना ऐकू.. त्यानंतर हे दोन्ही फॉर्म अजून चांगल्या प्रकारे कळतील..
 
  • पियानो आणि पायपेटी
१. पियानोमध्ये ७ सप्तकं असतात. पायपेटीमध्ये कमी सप्तकं दिसतात.
२. दोन्ही वाद्यांमधून येणाऱ्या आवाजांमध्ये महत्वाचा फरक आहे. पियानोची की वाजवली की येणारा आवाज कमी होत जाऊन विरून जातो. पायपेटीचा आवाज तसा विरून जात नाही..
३. पियानोला स्पर्श-संवेदनशीलता असते. तुम्ही जितक्या गतीनं पियानोची की दाबाल तितक्या प्रमाणात (कमी-जास्त) आवाज त्यातुन येतो. माझ्या माहितीप्रमाणं पायपेटी स्पर्श-संवेदनशील नसते. 
४. पियानोत एका सप्तकातल्यानंतर कधी कधी दूरच्या सप्तकातला स्वर येतो. अशावेळी हाताची लांब उडी मारावी लागते. पण पहिल्या स्वरावरून बोट उचलताच स्वर यायचा बंद होतो अाणि संगीत तुटक होतं. त्यात सलगता येण्यासाठी पियानोमध्ये पायानं वापरायचं पेडल येतं. पायानं पेडल दाबून ठेऊन पियानोवादक बोट उचलल्यानंतरही आवाज चालूच ठेवु शकतो. पायपेटीत असं पेडल नसते.
५. पियानोच्या आत असणाऱ्या तारा आवळुन वरचेवर पियानोचे ट्यूनिंग करावं लागतं. पायपेटीत अशा प्रकारची तारांची यंत्रणा नसते.
 
 तुम्ही सांगितलेली पियानोची खासियत एका मर्यादेपर्यंत बरोबर आहे.. 

पण पियानोची खासियत त्यापलिकडंही आहे.. पियानो वाजवताना तुम्ही उजव्या हातानं संगीतातली मेलडी वाजवताना, डाव्या हातानं वेगवेगळ्या प्रकारे accompaniment देऊ शकता.. हे अजूनही वेगळ्या वाद्यांत शक्य आहे - पण पियानोत तसं थोडंसं सोपं आहे (इतर वाद्यांचं नंतर सांगेन). ह्या क्षमतेसोबत, सात सप्तकांची रेंज आणी स्वराचा ध्वनि कमीजास्त करुन योग्य तो परिणाम साधण्याची क्षमता ही पियानोची खरी खासियत बनते..

वेगवेगळ्या सप्तकांतला फरक: कुठल्याही सप्तकातल्या एखाद्या स्वराची वारंवारिता (frequency) ही त्याच स्वराच्या मागच्या सप्तकातल्या वारंवारितेच्या दुप्पट असते.. त्यामुळं साऱ्या सप्तकांमधले तेच असणारे स्वर एकमेकांत मिसळून जातात.. हे मी नंतर पुन्हा तपशिलवार सांगेन..

काही प्रश्नोत्तरे

मग अशी accompaniment , प्रत्येक वाद्यांमध्ये शक्य आहे की काही ठराविक मध्येच ....
--> मेलडी आणि accompaniment एकाच वेळी वाजवणं हे प्रत्येक वाद्यात शक्य आहे असं नाही. उदा. बासरी किंवा सनईमध्ये एका वेळी एकच स्वर येतो.

आणि आपल्या राग मधील नियमांप्रमाणे यात पण नियम आहेत 
--> आपल्या रागनियमांप्रमाणं तिकडंही पारंपारिक नियम आहेत. पण अाधुनिक कालखंडात (म्हणजे १९०० नंतर) यातले बरेच नियम तोडुनही वेगळ्याच प्रकारच्या चांगल्या रचना केल्या. हा मोठा विषय आहे, आपण नक्कीच त्यावर बोलू.

प्रत्येक वाद्याचे ठराविक नियम असतात ? 
देशाप्रमाणे ते बदलतात ....?
--> या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकजण वेगळं देऊ शकेल. माझ्या मते नियम संगीतात असतात, त्यांचं पालन करण्यासाठी वाद्य वाजवताना जे नियम पाळावे लागतील ते त्या वाद्यावर नियम.

थीम अँड वेरिएशन्स

बरोक काळापासून लोकप्रिय असणारा एक संगीताचा प्रकार म्हणजे 'थीम अँड वेरिएशन्स'. यामध्ये सुरूवातीला एक थीम येते. ती पू्र्ण असते. (म्हणजे ती थीम संपल्यावर आपल्याला संगीताचा शेवट झाल्यासारखा वाटतो.) नंतर संगीतकार त्याच थीममध्ये वेगवेगळ्या प्रकारे विविधता आणून ती थीम (वेगळ्या रुपात) सादर करतो. याप्रकारे एकाच थीमची आपल्याला एकामागोमाग एक अशी वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. 

बीथोव्हनची डायबेली वेरिएशन्स (डायबेलीच्या मुळ रचनेवर केलेली वेरिएशन्स), मोत्झार्टच्या अकराव्या सोनाट्यामधली पहिली मूव्हमेंट ही प्रसिद्ध उदाहरणे मानता येतील.. बाखची गोल्डबर्ग वेरिएशन्सही (गोल्डबर्ग नावाच्या वादकानं ही वेरिएशन्स पहिल्यांदा वाजवलीत) प्रसिद्ध आहेत..
आपण ह्या तिन्ही रचना ऐकुया - ऐकताना 🎧 वापरा !!

 
मोत्झार्ट अकरावा सोनाटा - पहिली मूव्हमेंट ऐका. https://youtu.be/FZ1mj9IaczQ
 
बीथोवनची डायबेली वेरिएशन्स. https://youtu.be/dokkniOwSlQ 
 
बाखची गोल्डबर्ग वेरिएशन्स. https://youtu.be/sbOwhF1hFcg
 
🔻अंजली टक्के
 
पियानोची संगीताशी संबंधित नसलेली बाजू ,समजून घ्यायला आवडेल
संगीत हे समाजात झिरपत असते, समाजाची जाणीव प्रगल्भ करत असते 
ते संगीतापासून बाजूला नाही करता येणार .

आपल्या जाणिवा, सुख दुःख हे संगीतातूनच व्यक्त होऊ शकते .
तुम्ही काहीसे म्हणाले, शब्द हे व्यक्त करण्याचे फार अपूर्ण साधन आहे .....
भावना संगीतामधूनच व्यक्त होऊ शकतात.
 
पियानोशी संबंधित एक इंग्लिश picture फार पूर्वी पहिला होता,
एका समुद्र किनारी पियानो वादक आणि त्याचा पियानो येऊन पडतात ....आणि तो प्रदेश काहीसा आदिवासी असतो .....
 
असे काहीसे 
पण तेंव्हापासून पियानो आणि संगीताबद्दल आकर्षण वाटू लागले 
मग एकदा ....casset विकत घेताना, वडीलांसारखे दिसतात म्हणून मल्लिकार्जुन मन्सूर यांची एक casset विकत घेतली .
 
Classical समजत नव्हतेच पण आवडत पण नव्हते . उलट तें ऐकतात म्हणून वडिलांची चेष्टा करत असे.
 
सहज लावली ,
लक्ष नव्हतेच......
आणि अचानक त्या आवाजाकडे लक्ष वेधले गेले ,.
पार्वतीपदे महादेव .
चालू होते 
वेड्यासारखे पुन्हा पुन्हा ऐकत राहिले ,आणि 
मग classical जीवनाचा एक अविभाज्य  भाग झाला.
 
समजत नाही काही ,पण ऐकायला आवडते . समजले की ऐकण्याचे एक समज येते. आणि त्यामागील घटना समजल्या की सर्वार्थाने उमजते.
 
पियानो ऐकताना, पियानो ज्यांनी बनविला त्यांची त्याबद्दल ची ओढ, घालमेल, प्रयत्न , एकांतवास , कधी यशस्वी  तर बऱ्याचवेळा अयशस्वी..
आणि त्यातूनच निर्माण होणारे प्रगल्भ सूर ......
निर्मिती समजायला निर्माता आणि ते जग समजायला हवेच ना.....
 
🔻 डॉ. वृंदा
 
हो ,तो समजला की मग पियानो काय नि पावा काय सतारही आपलीच आपण वाजू लागते .कुणी वाजवायची गरज त्यावळी पडत नाही .मग फक्त ऐकायचं पंचप्राण कानात एकवटून ..आणि झुलायचं झोपाळ्या वाचून .
 
🔻 विद्याधर शुक्ल

ऐकण्याबरोबर  Schiff ची आकंठ बुडून गेलेली समाधिस्थ भावमुद्रा  पहायलापण मजा आली.डाव्या हाताने keys कुरवाळत असतानाच  उजवा हात अलिकडे घेऊन  वाजवण्याचे कौशल्य औरच !  शेवटचे  रिट्रीट पिसेस पण मस्त आपल्याकडे मैफलीत आवडत्या जागी  आवडले की टाळ्या वाजवण्याची पद्धत दिसत नाही

🔻 दुष्यन्त पाटील

१८०२ मध्ये एकानं बाखचं चरित्र लिहिलं. या चरित्रात सांगितलेली ही गोष्ट आहे..

गोल्डबर्ग हा उत्कृष्ट हार्प्सिकाॅर्डवादक होता.. वय जेमतेम १४-१५ असेल त्याचं त्यावेळी.. एका सरदाराकडं (count) तो राहायचा.. संगीत गाजवायचा.. हा सरदार गोल्डबर्गला घेऊन बाखकडं जायचा.. बाख त्याला वादनातली तंत्रं शिकवायचा..
 
ह्या सरदाराला एकदा काहीतरी अाजार झाला आणि त्याला निद्रानाशाचा त्रास सुरू झाला.. रात्रभर झोप न लागल्यानं हा सरदार बेचैन व्हायचा.. एकदा बाखसमोर त्यानं गोल्डबर्गला बोलून दाखवलं की त्याला वाहती चाल असणारं मनाला आनंद देणारं, उत्साही करणारं संगीत रात्री ऐकायला हवं होतं..
 
बाखनं त्यावेळी हे संगीत रचलं.. खरंतर बाखनं थीम अँड वेरिएशन्स हा प्रकार त्यातल्या हार्मनीच्या रिपिट होण्यामुळं तोपर्यंत टाळलाच होता.. पण बाखच्या परिसस्पर्शानं ह्या संगीताचं सोनं झालं..
 
हे संगीत (बिचारा) गोल्डबर्ग रात्री सरदाराला झोप नाही आली अाणि त्यानं फर्माईश केली की वाजवायचा.. हे संगीत त्या सरदाराला इतकं आवडलं की नंतर त्यानं बाखला त्यानं (त्यावेळच्या चलनात) मोठं बक्षिस दिलं.. बाखला एकाच रचनेसाठी इतकी मोठी रक्कम कधीच मिळाली नव्हती..

🔻 दुष्यन्त पाटील

माझं आवडतं पुस्तक:
युक्रेनमधल्या (त्यावेळच्या रशियामधल्या) हेन्रिकची लहान असतानाची गोष्ट. त्याचा मामा (फेलिक्स ब्लमेन्फिल्ड) दोन-चार वर्षांतून एकदा त्याच्या गावी यायचा. एकदा मामा आला की तो २-३ आठवडे तिथंच राहायचा.. हे दिवस हेन्रिकच्या आयुष्यातले सोनेरी दिवस असायचे.. संध्याकाळी मामा पियानोवर संगीत गाजवायचा.. कधी कधी रात्री उशीरापर्यंत तो पियानो गाजवायचा.. हेन्रिक मंत्रमुग्ध व्हायचा.. हेन्रिकवर या पियानोवादनाचा प्रभाव पडला तो जन्मभरासाठी..
मामा पाश्चात्त्य जगतातील एक सुप्रसिद्ध संगीत रचनाकार होता.. 
तसं तर हेन्रिकचे आईवडील पियानोचे शिकवणी घ्यायचे.. पण हेन्रिकवर जास्त प्रभाव पडला तो त्याच्या मामाचा...
ह्या हेन्रिकनं मोठेपणी एक पुस्तक लिहिलं 'The art of piano playing'.. यात त्यानं वादनाची कलात्मक बाजू खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितली.. अर्थातच पियानोवादनाच्या तांत्रिक बाजूही त्यानं ह्या पुस्तकात खुप छान हाताळल्या.. पियानो शिकवण्यात त्याचा हातखंडा होताच.. गिलेल्स, (आपल्याला एका आधीच्या पोस्टमध्ये भेटलेला) रिश्चरसारखे २०व्या शतकातले महान पियानोवादक त्याच्याकडेच तयार झाले.. (गंमत म्हणजे आपल्याला भेटलेला होरोविट्झ त्याच्या मामाकडं शिकला.)
हे पुस्तक जगभर पियानोवादनातलं अजुनही सर्वोकृष्ट पुस्तकांपैकी एक मानण्यात येतं.. मूळचं रशियन भाषेत लिहिलं गेलेलं हे पुस्तक जगभरच्या भाषांमध्ये अनुवादीत झालं..
नाॅर्थम्प्टनमधल्या वाचनालयात मला हे पुस्तक असंच हातात पडलं अाणि पहिली काही पानं वाचताच हे माझं आवडतं पुस्तक बनलं !!

🔻 संजय गावडे

संगीत या विषयावर मला आवडलेलं पुस्तक म्हणजे...
गोविंदराव टेंबे यांचं 
" माझा संगीत व्यासंग"...
मागच्या आठवड्यात मी बारा स्वरांची वृत्ती ही माहिती पोस्ट केलेली ती याच पुस्तकातील होती..

 
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

हिशोब सांगते ऐका

  • सागर पाटील
गीत -हिशोब सांगते ऐका 
संगीत - राम कदम
गीतकार -जगदीश खेबुडकर
स्वर - कृष्णा कल्ले बालकराम
चित्रपट- केला इशारा जाता जाता 1965

प्रस्तुत गाणे हे जबाब दिल्यासारखे आहे. गाण्यातील   स्त्री भावजी ला सांगते की माझा नवरा मला 15 रुपये दिलेला होता.पण ते सगळे 15 रुपये मी माझ्या संसारासाठीच  खर्च केलेले आहेत. ते ती वरील गाण्यातून कुठे कुठे पैसा खर्च केला ते सांगते 
1. 15 रुपये असताना मी यांच्या साठी 1 रुपयाचा सदरा घेतला
2. 14 रुपये होते  आता यांच्या घरात सौदा नव्हता यासाठी 1 रुपया खर्च केला.
3.13 रुपये होते तेव्हा यांच्या घरात फुटका डेरा होता तो बदलण्यासाठी 1 रुपये खर्च केला.
4. 12 रुपये होते तेव्हा यांच्या बहिणीला सासरी थारा नव्हता तेंव्हा त्यासाठी 1 रुपये खर्च केला.
5.11 रुपये शिल्लक होते तेंव्हा यांच्या मेव्हणीचा खूप नखरा होता त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
6. 10 रुपये ची नोट  होती तेव्हा  यांच्या घरात ताट विकत आणले त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
7.  जेव्हा 9 रुपये उरले तेंव्हा जाऊ आली त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
8. जेव्हा 8 रुपये उरले तेंव्हा माझा दीर भेटला त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
9. जेव्हा 7 रुपये तेव्हा यांच्या घरात जातं नव्हतं ते आणण्यासाठी 1 रुपये खर्च केला.
10. जेव्हा 6 रुपये उरले तेंव्हा पोलीस पाटील ला चहा पाजला त्यासाठी 1 रुपया खर्च झाला.
11.जेव्हा 5 रुपये उरले तेंव्हा यांच्या आरशाला काच आणली त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
12. जेव्हा 4 रुपये उरले तेव्हा यांच्या घराचा दरवाजा दुरुस्त केला त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
13. जेव्हा 3 रुपये उरले तेव्हा यांच्या आईचा फोन आला तेव्हा 1 रुपये खर्च झाला.
14.जेव्हा 2 रुपये उरले तेव्हा यांच्या तोंडाला घाण होती त्यासाठी 1 रुपया खर्च केला.
15 जेव्हा 1 रुपया शिल्लक होता तेव्हा माझ्यासाठी लेक दत्तक घेतलाय त्यासाठी 1 रुपया खर्च केला
 अशा प्रकारे 15 रुपयांचा ती हिशोब सांगते. या गाण्यामध्ये यमक हा अलंकाराचा वापर झालेला दिसतो. प्रस्तुत गाण्यामध्ये स्त्री हीच तिचा संसार सांभाळते असे दिसते.स्त्री हीच प्रमुख आहे असे दिसते. 

सागर पाटील
 
  • तृप्ती लोणकर
हिशोब सांगते ऐका
         अनेक गाणी ऐकताना एखाद गाण हृदयाचा ठाव घेत.म्हणतात ना, "वाङमय हा समाज मनाचा आरसा असतो."सनातन काळापासून घर चालवणे हा स्त्रियांच्या कामाचा भाग असतो. नवरा पैसे देतो.परत पैसा मागितला की घरात जे रणकंदन होते त्याच मनोरंजक चित्र या गाण्यातून समोर उभ राहत
            हे गोड संवाद आपणही आपल्या घरात ऐकत असतो.फक्त चित्रपटातील अभिनेत्रीच्या  जागी अापली आई,आजी,काकू,मावशी,ताई,माई, अक्का,किंवा पत्नी असते.ती तिच्या परीने हिशोब सांगत असते पण आपल्याला म्हणजे पुरुषांना तो हिशोब पटत नसतो.त्यांच्या मनात काय वायफट खर्च करते हे भाव असतात आणि चेह-यावर ते दृग्गोचर होतच असतात.अगदी हीच सिच्यूएशन गाण्याची आहे.
            नव-याशी बोलता येत नसल्याने ती भाऊजीना लक्ष्य करून खर्चाची विगत देत आहे.
            ही विगत देतानाचा तिचा थाट पहाल तर एखाद्या सी.ए.ला देखील लाजवेल इतक्या बारकाईने ती एक एक रुपायाचा खर्च सांगते
          यांनी रूपये दिलत पंदरा
            यांच्या अंगात नव्हता सदरा
            तिथ एक रूपाया खरचला
 पहिल्या प्रथमच ती नव-याचा बोका धरते. तुला सदरा आणला
        नंतर
           आता रुपये -हायले चौदा
            नि यांच्या घरात नव्हता सौदा
अगदी सरळ सरळ प्रश्न विचारला आहे.घरात काही नसताना तुला खायला काय घालू?नवरा केवळ चरफडत गप्प. पुढे काय बोलेल.
         आता रूपये -हायल तेरा
          यांच्या न्हाणीत फुटका डेरा
  मी यांच्या घराची दैना सांभाळत  आहे हे सांगताना यांच्या न्हाणीत फुटका डेरा.म्हणजे मातीच्या मडक आहे.मी पाणी कुठे साठवणारे.केला खर्च
           आता रूपये -हायल बारा
            यांच्या भयनीला नव्हता थारा
 असे सगळे खर्च करून आता बारा रूपये हातात होते.तर यांची बहिण उगवली.तिला कोणीही पैसा साठी थारा देत नव्हता मी दिला. पैसे खर्च केले.
            आता रूपये -हायल अकरा
           यांच्या मेव्हनीचा भारी नखरा
आता अकरा रुपये हाती होते.तर यांची मेव्हणी( तिची बहिण) आली होती.तिचा नखरा सांभाळून तुझी अब्रू झाकण्या साठी मी पैसे खर्च केले
           आता दहाची -हायलीया नोट
             न यांच्या घरात नव्हत ताट
परत तोच लक्ष सांसारिक कमतरतेवर आल आता फक्त दहा रुपायाची नोट राहिली  तर यांच्या घरात ताट नव्हत
ते आणल.
             आता रूपये -हायले नऊ
           न मागल्या दाराने आली जाऊ
 राहिलेला पैसा  ठेवणार तर अचानक जाऊ दारात आली.तीही कशी गपचूप घरात अली.तिन आणलेला पैसा कोणाला कळू नये म्हणून मागच्या दाराने आली. तिला देण्यासाठी खर्च झाला.
          आता रूपये -हायले आठ
         न पडली माह्या दीराची गाठ
आठ रुपये होते तर अचानक रस्त्यात माझा दीर भेटला.तुमचा भाऊ होता मग काय नाही म्हणणार.
         आता रूपये -हायले सात
          न यांच्या घरात नव्हत जात
यांच्या घरात नसलेल्या वस्तूत जात होत.मला त्रास होई म्हणून ते घेतल.भाक-या पोळ्या हादडता ना?मग पीठ दळण्यास साठी जात नको?.केला खर्च
          आता रूपये -हायले सहा
      न पोलिस पाटलाला पाजला चहा
येथे तर ती नव-यावर कडाडून हल्ला करते.अरे दारुड्या दारू पिऊन रस्त्यात धमाल करतोस.पोलिस पकडतात.मग त्याला चहा पाजून तुला सोडवावे लागतो.म्हणून पोलिस पाटलाला चहा पाजला.
       आता रुपय -हायले पाच
        यांच्या आरशाला नव्हती काच
तुझ्या घरात आरसा नव्हता.मला काही फरक पडत नाही.तुलाच तुझा रुबाब पाहायचा म्हणून आरसा बसवून घेतला.माझ्या साठी नाही.
         आता रूपये -हायले चार
        न पुढल्या सोप्याच मोडलया दार
  घराची डागडुजी करायलाही तुला वेळ नाही.मग मलाच पहावे लागल.पुढच्या सोप्याच्या दार दुरुस्त केल. नाहीतर घरात कोणी ही शिरेल.
   आता रूपये रायले तीन
   यांच्या आईचा आला फोन
आता फक्त तीन रुपये उरले होते.तर पैसे मागण्या साठी यांच्या आईचा फोन असला.गेला पैसा तिकडे.
 आता रूपये -हायले दोन
  न यांच्या तोंडाला आली घान
दोन रुपये उरले होते.तू दारू पिऊन आलास मग तुला नीट करण्यासाठी मला पैसा खर्च करावा लागला
        आता रूपया -हयला योक
        न मी हा दत्तक घेतलाय ल्योक
आतातर एकच रूपाया  उरलाय.मी नव-याला सांभाळायचा मक्ता घेतलाय ना.त्यालाच खर्चा साठी दिला.
           ह्या नंतर शेवटी म्हणते भाऊजी असा खरचला पैका.हे भाऊजीना नसत तर नवरोबाला सांगण असत.असा खरचला पैका
            असा हिशोब तो सुद्धा तोंडी आणि भाऊजीं समोर कारण.         नव-याच्या  वागणुकीचा आणि त्याने दाखवलेल्या अविश्वासाचा राग चिड आली असल्याने ती त्याच्याशी बोलत नाही.मग पैसा कुठे गेला हे सांगण्या साठी भाऊजींचा आश्रय घेतला आहे.त्यात असणारी चिड गाण्यातील. "त्यांच्या" या शब्दानी पूर्ण अधोरेखित होते.
               त्याच बरोबर मी माझ्यासाठी नाही हो खर्च केला,पैसा उडवला नाही हे ती नव-याला बजावून सांगते.
           भांडण लुपुटूच असल तरी हिशोब सांगता नाही ती पायानी शेण गारा कालवत आहे.घर नीटनेटके करण्यासाठी ती भांडतानाही काम करते आहे.मग तिची चीड योग्य वाटते.
         खरच कवीने इतक बारकाईने निरीक्षण करून चित्रण केल आहे.प्रत्येकाला ते आपलस करून टाकत. यात जगदीश खेबूडकरांची कमाल दिसते.
            तर राम कदम सारख्या  सशक्त संगीतकाराने  लोक संगीताचा बाज वापरून ते अगदी माणसांच्या ओठी खेळवल आहे.त्यामूळे हे गाण परत परत ऐकावे वाटत
             कृष्णताई कल्ले यांनीतर वरताण केली आहे."यांच्या" या शब्दाच वजन इतक अचूक उचलले आहे की गाण्यातून स्त्रीच्या वेदना,चीड अगदी स्पष्ट कळते.
               गोड चेह-याच्या अभिनेत्रीबरोबर संयत आभिनयान जणू प्रत्येक बाई जिवंत केली अाहे.
भाऊजी समोर बोलायचं आहे त्यामुळे चेहरा हालता नये आणि नव-याला  मनातली भावना कळली पाहिजे.हे लक्षात घेऊन त्या अभिनेत्रीने बरोबर ती स्त्री जिवंत केली आहे.
              जेव्हा एखाद गीत जनमानसाच्या मनाचा ठाव घेत तेव्हा ते चिरकाल टिकत.या गीतान तर १९६५ पासून कित्येक वर्ष जनमानसावर राज्य केल आहे.
                 तृप्ती लोणकर
 
  • संजय गावडे

घरातल्या कर्त्या स्रिने (बाईने) आपल्या सांसारिक जीवनाचा हिशोब यातून मांडला आहे....हे गाणं ऐकताना या बाईच्या तोंडून जो हिशेब बाहेर पडतो ते ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली...
अधूनमधून तिही असा हिशेब आमच्या समोर मांडत असते...
संसाराचा गाडा हाकत असताना...या बाईने सगळं सांभाळून घेतल्यामुळे (अॅडजेस्टमेंट केल्यामुळे) तो गाडा व्यवस्थितपणे चालू असतो...
आणि ती स्वतःसाठी फारसा खर्च करत नाही... इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते...
सुरुवातीला तिच्याकडे आर्थिक सुबत्ता असते (रुपये १५) तेव्हा ती नवऱ्याकडे लक्ष देते....
स्वतःचा संसार थाटण्यासाठी....लक्ष देते...
कालांतराने नणंद मोठी होते त्यामुळे तिचं लग्न लावून देणं वगेरे जबाबदारी पार पाडते...तिच्या सासरच्या मंडळींच्या इच्छा पूर्ण करुन तीला सासरचे लोक कसे गुण्यागोविंदाने नांदवतील ते पाहते...

मेव्हणी , दिर आणि आपले नातेवाईक यांचे 
नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न चालू असतो...
हे सगळं करत असताना उतारवयाच्या चिंता सूरु होतात...
घराची डागडुजी
सासूचं आजारपण...
नवऱ्याचं आजारपण..
मुलांचं करणं...
आणि हे सगळं करत असताना...स्वत:च्या गाठीला मात्र काहीच शिल्लक राहत नाही...
ही परिस्थिती...प्रत्येक संसारी बाईच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने येत असते....याचं वर्णन (हिशेब) कविने मांडलेलं आहे...
गीतकार जगदिश खेबुडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गीत.. कृष्णा कल्ले बालकराम यांकडून राम कदम यांनी...
केला इशारा जाता जाता साठी उत्तम संगीत देऊन गाऊन घेतले आहे....


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

सलील - संदीप


  • ओंकार कुलकर्णी

सलील कुलकर्णी !! कविता कळणारा संगीतकार, संदीप खरे च्या कवितांना तर त्याने अप्रतिम चाली दिल्याच आहेत पण कुसमाग्रजांपासून ते बोरकारांपर्यंत सगळ्यांच्या  किविता त्यांच्या अर्थानुसार चालबद्ध केल्या आहेत ! हे सगळं सांगितलंय त्यांनी त्याच्या "कवितेचं गाणं होताना " या युट्युब वरच्या वेब सिरीज मध्ये.
 सगळे च्या सगळे 26 भाग अप्रतिम आहेत विशेषतः गाण्याचा , संगीताचा आणि कवितांचा जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ! जणू एक ऑनलाईन कोर्सच ! 
याची टायटल सिग्नेचर ही भारीच ! तव नयनांचे दल ची पेटीवरची सुरावट .. 
 माझ्या आवडलेल्या एका भागाची लिंक खाली देतोय.

https://youtu.be/_i5TGITHikk

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

Thursday, April 12, 2018

एक धागा सुखाचा



  • तृप्ती लोणकर
एक धागा सुखाचा
                       हे गाण वाचताना,ऐकताना गाताना कोणाला उजवं ठरवायच आणि कोणाला डावं या बाबत अत्यंत दोलायमान परिस्थिती निर्माण होते.ग.दि.मा  उत्तम म्हटले तर त्याच्या वरचढ. बाबूजी आहेत.त्या दोघांच्या पेक्षा काकणभर सरस राजाभाऊ परांजपे आहेत.
                  हे गाण ऐकून माणूस भावूक होतो.राजाभाऊंनी हे गाण त्यातल्या भावा सहीत निर्विकार.    चेह-याने साकार केल.हे काम महाकठीण. गदिमांचे शब्द म्हणजे  म्हणजे मुळात आभाळाला गवसणी असते. सहृदय माणूस त्यात पूर्णपणे बुडून जातो.या  चित्रपटातील राजाभाऊंची  जी व्यक्तिरेखा आहे ती अगदी "सुखदुःखे समे कृत्वा"  अशा पद्धतीची आहे.ते तुरुंगातही तितक्याच सहजतेने जातात जितक्या सहजतेने बाहेर वावरत असतात.
                  अशा अवलियाच्या तोंडी जीवनाचे तत्वज्ञान अपेक्षित असत.तेच या गाण्यातून दिसत.
  कवी म्हणतात
              एक धागा सुखाचा
               शंभर धागे दुःखाचे
               जरतारी हे वस्त्र माणसा
                तुझिया आयुष्याचे॥
 अायुष्याला वस्त्राची उपमा देण हेच 
एक नाविन्य आहे.हे वस्त्र कस तर सुखाच्या एका चमचमण्-या जरीच्या किनखापी धाग्या बरोबर शंभर दुःखाचे  रया गेलेले धागे एकत्र करून माणूस नावाच एक जरतारी वस्त्र निर्माण केल.त्याच्या आयुष्यात अनेक आनंदाचे,दुःखाचे - निराशेचे - उभारीचे प्रसंग निर्माण केले.अस मानवी अशाश्वत जरतारी आयुष्य विणल गेल आहे.
            पांघरसी जरी कसला कपडा
             येसीउघडा जासी उघडा
             वस्त्रासाठी करीशी नाटक
              तीन प्रवेशांचे.....
या कडव्यात तर कवीच्या कल्पनेची भरारी आणि तत्वज्ञानाची बैठक दिसते. आईच्या गर्भार असणारा तो किंवा ती यांच्या शरीराला स्व नसतो गर्भ नेहमीच. विचारत असतो मी कोण आहे?पण जगात पाऊल टाकताच त्याला त्याच्या शरीराला ममत्वाचे कपडे चढतात.मी अमूक,मी असा,माझ असे,मला हे आवडते,मला श्रेष्ठत्व हवे,मी केले.मी मिळवले.याला कवी कपडे म्हणत आहेत.यातला कोणताही कपडा अंगावर चढला की त्या रंगात माणूस रंगून जातो.पण त्याच वेळी जन्म -मृत्यूच चक्र. आबाधित आहे.हे विसरतो.जन्मला येताना माणसाला स्व ची ओळख नसते.तर मृत्यूपरान्त त्याची ओळख पुसली जाऊन फक्त प्रेत,डेडबाॅडी अशीच रहाते.हे सत्य माहित असता
तो या ओळखीसाठी तीन प्रवेशांच नाटक खेळत असतो.येणारी भूमिका 
तो पार पडतो. तरीदेखील त्या नाटकाचा सूत्रधार तो नसतो
             मुकी अंगडी बालपणाची
             रंगीत वासने तारूण्याची
              जीर्ण शाल मग उरे शेवटी
               येणे वार्धक्याचे.....
वस्त्रांवर प्रकार सांगताना ग.दि.मा. म्हणतात रम्य हवहवस वाटणार बालपण हे म्हणजे मुक्या अंगड्यां टोपड्यां सारखे आहे.प्रत्येकाला ते हव आहे.दुस-यान आपल्याला नटवाव सजवाव त्यांच्या नजरेत आपण असाव जबाबदारी मुक्त सुंदर आयुष्य आहे.पण तुमच्या तोंडात वाचा नाही ते मुक अाहे. बालपणाला स्वत्वाची जाणीव नाही.म्हणूनच ते निर्मळ,मोहक आकर्षक आहे.
                नंतरची स्थिती तारूण्याची हे रंगीत आहे.पैसा,प्रसिद्धी,घर,संसार,मूलबाळ 
 या गुंत्यात अडकवून कधी सुख,कधी दुःख,आनंद,खूषी,तृप्ती  अतृप्ती, विरह - मिलन,  अशा अनेक संमिश्र भावनांच मिश्रण या कालखंडात असत.त्यात मुख्य म्हणजे स्वामित्व भाव हा महत्वाचा मी -माझं -मला -माझ्यासाठी -माझ्यामुळे या रंगीत भावनांनी त्याच  विणकाम. झाल आहे.त्यात स्वकर्तृत्वाचा किनखापी धागा मिसळला असल्याने ते जरतारी झाल आहे.ममत्वाचा रंग त्यावर आहे.
                पुढच्या पायरीवर अाबाधित शाश्वत सत्य ग.दि.मा. सांगतात.ज्या दिवशी जन्म होतो.
त्या दिवशी वार्धक्य येणार शरीर थकणार, मग कसल ममत्व, कसले रंग,ढंग उरते ते फक्त सहजीवन.ज्यात आठवणींच्या जरीच्या तारा असतात तिच ती उबदार शाल पांघरून येणार वार्धक्य.खरोखर किती सुखद कल्पना आहे.जरतारी उबदार वार्धक्य.
      या वस्त्राते विणतो कोण?
       एकसारखी नसती दोन
         कुणान दिसले त्रिखंडातया
          हात विणकराचे.....
 ही आयुष्याची वस्त्रे कोण विणतो?असा प्रश्न कवीला पडतो.हा केवळ कवीलाच नाही तर सगळ्याना हा प्रश्न आहे. तो असतो कुठे?हा विणकर इतका कुशल आहे.की तो वस्त्र विणताना एकाच नमुन्याची दोन विणत नाही.प्रत्येकाचे डिझाईन वेगळे.स्वभाव वेगळे,शरीराची ठेवण वेगळी,मानसिकता वेगळी अशी माणसं आणि त्यांची आयुष्य विणणारा  असा हा विणकर आणि त्याचे हात कोणालाच संपूर्ण तीनही जगात म्हणजे स्वर्ग,मृत्यू,पाताळ या ठीकाणी दिसलेच नाहीत. 
            गीताचा अर्थ जितका सखोल,गंभीर आहे .तितकी ताकदीची गायनाची शैली ही आहे. जडजंबाल तत्वज्ञान सहज सोप करून दिल तरी ते प्रवाही पणे मांडणी एक दिव्य आहे.बाबूजीनी जणू ते तत्वज्ञान पचवून कथेसारख (नॅरेटिव्ह) करून लोकांच्या मनात ठसवल आहे.
        काही वेळा अस वाटत ग.दि.मा.,बाबूजी आणि राजाभाऊ हा मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण त्रिकोण आहे.पण त्याही पेक्षा मी अस म्हणेन
     हे तिघे"हिरकमणिकाञ्चन संयोग आहेत.प्रत्येकाच वेगळे अस्तित्व आहेच पण एकत्रित पणे ते जास्त शोभायमान होतात. कोण श्रेष्ठ,चांगला,उत्तम हे ठरवताना रसिक त्या गाण्यात हरवून जातो
             आसवे गाण जीवनाचे शाश्वत सत्य आहे.
 
  • संजय गावडे
या गाण्या मधे....
मानवी जीवनाचे रहस्य उलगडून दाखवले आहे...
आपण नेहमीच  म्हणतो ...
सुख जवा पाडे , दुःख पर्वता एवढे...
कर्म सिद्धांतानुसार प्रत्येकाला सुख आणि दुःखाची त्याच्या प्रारब्धा नुसार प्राप्ती होत असते...
हे जीवन रुपी वस्त्र विणताना त्यात दुःखाचेच धागे जास्त असतात...पण एखादा जरी सुखाचा धागा असला तरी या जीवनाला आनंददायी बनवतो...
असे हे जरतारी वस्त्र मानवाच्या आयुष्याचे आहे....
आणि हे वस्त्र जरी मानवी जीव आयुष्यभर मिरवत असला त्या साठी खटपट करित असता तरी... त्यासाठी कोणतेच वाईट कर्म करु नये... कारण (आत्मा) जीव जन्माला आला तेव्हा उघडाच होता...त्याच्याकडे ऐहीक संपत्ती नव्हती... आणि जातानाही तो उघडाच जाणार आहे...त्याच्या बरोबर हे इह लोकातले काहीच जाणार नाही...जाणार आहे ती त्याच्या कर्माची गोळाबेरीज...म्हणजेच संस्कार..त्या साठी आपण हे जीवनरुपी तीन प्रवेशाचे नाटक (बालपण , तरुणपण, म्हातारपण..) करताना...असे कर्म केले पाहिजे की मागे काहीतरी कीर्ती रुपी उरावे....
 
आणि शेवटी तर कवी म्हणतोय..
या वस्त्राला कोण विणतो ते दिसत किंवा कळतंही नाही...खरंतर हे वस्त्र प्रत्येकाच्या कर्म  सिद्धांतानुसार विणत गेलेले असते...
आणि प्रत्येकाचे कर्मफल वेग वेगळे असल्यामुळे...प्रत्येकाचे वस्त्र पण वेगवेगळे बनते...या जगातील अगणित वस्त्रांमधे...एकही वस्त्र दुसऱ्या वस्त्रा सारखे नसते...हे सत्य आहे...
 
आणि या गाण्याची निर्मिती  ही बाबुजी आणि गदिमा या जोडगोळीने एकत्र येऊन केल्यामुळे त्यांच्या इतर गीतांप्रमाणे या ही गाण्याने योग्य तो परिणाम साधत...या गीताला अजरामर करुन ठेवलेलं आहे....
 
  • विद्याधर शुक्ल
बाबूजी आणि गदिमा अगदी   ‘’एक दुजे के लिये’’ ! या  जोडीची अनेक गाणी आपण मनात नाहीतर  मोठ्याने जमेल तशी  गुणगुणत आलो आहोत  ...त्यातल हे नेहमी ओठावर येणार गाण ! जीवनाच्या  तत्वज्ञानाच्या   आभाळाच  प्रतिबिंब ५० /६०  शब्दांच्या छोट्या ओंजळीत दाखवण्याच कसब गदिमाच जाणोत  . संतानी  तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भगवद्गीता , ज्ञानेश्वरी , गीताई  असा प्रवास केला.गदिमांनी गीताईपेक्षाही सोप्या आणि कमी शब्दात ही किमया साधली . बाबुजींनी धीर गंभीर चाल आणि भावनेने ओथंबलेले शब्द यातून गाण्यातल्या तत्वज्ञानाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल.
  आयुष्याच्या तिन्ही  अंकात   सुखाबरोबर चाललेला पाठशिवणीचा  आणि सुख दुःखाचा  उन सावलीचा चालणारा खेळ हे एक वास्तव आहे .हे वास्तव अनेकदा जाणवत असल तरी “एक धागा ......” सारख्या गाण्यांनी हा विचार समग्रपणे  आणि मनाला भिडेल अशा रीतीने समोर येऊन आपल्याला  अंतर्मुख करतो . मला वाटत या मानसिक अवस्थेत   या  वास्तवाकडे   आपण कस बघतो हे महत्वाच आहे . ‘’अस होणारच’’ हे  आपण मनापासून स्वीकारू शकलो नाही तर सुखाच्या धाग्यानाही आपण पारखे होऊ शकतो .स्वीकार केला तर सुखाच्या क्षणांचा आनंद तर उपभोगता येतोच पण दुखाची धार पण नक्की कमी होते . दुसर अस की आपण बर्याच वेळा दुखाचे प्रसंग बहिर्गोल भिंगातून पाहून मानसिक त्रास वाढवून घेतो .पण  दुःख अंतर्गोल किंवा बहिर्गोल दोन्हीही   भिंगे न वापरता सध्या काचेतून पाहणे  शक्य झाले तर आपण सुख निर्देशांक वाढवू  शकतो . तिसर म्हणजे अनेकदा दुख आपणच ओढवून घेतलेला असत .आपल्या हातात आहे ते न केल्यामुळे निर्माण झालेलं ! प्रयत्नवादातूनही दुखाचे काही धागे कमी करता येन शक्य असत .
या गाण्यातून  जीवनाच वास्तव निरखाव ...स्वीकाराव आणि प्रयत्न करून दुखाचे धागे जमतील तेवढे कमी करावेत एवढच  वाटत .
 
  • डॉ.वृंदा कार्येकर
मी हे गाणं ऐकून त्या आधारे माझे विचार कवितेतून मांडलाय. पूर्वीची आहे . तीच पाठवते,  दुःखावर मी लिहीन ,लिहायचेच आहे ,ती ऊद्याची पोस्ट .

एक धागा दु्ःखाचा
 शंभर धागे सुखाचे 
सुतीच साधे वस्त्र  
आहे माझिया आयुष्याचे .
 
ह्या वस्त्राचे मोल, अमोल 
विरळ काही,  सुबक सुंदर   
जरीही नाही दिसला विणकर
शोध तयाचा घेते .
 
पांघरेन मी कोणतेही वस्त्र
माझिया पुढती थिटेच अस्त्र
मुक्ती साठी घडते नाटक 
अनेक हे जन्मांचे .
 
सर्वच पथ ते असती खडतर 
राजदैवी पथ तो सुलभ खरोखर 
पथावरून त्या मीच चालते 
दिसले घर ते त्याचे  .
 
रेंज आता आली म्हणून ऊशीर .
 

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम
 
 
 

Monday, April 9, 2018

Western संगीत


🔺 प्रेमाचे स्वप्न - क्र. ३
-------------------------

स्केल म्हणजे काय, की ची संकल्पना काय आहे, सिंफनीची १ली मूव्हमेंट कशी असते किंवा सोनाटाची ३री मूव्हमेंट कशा प्रकारची असते - असल्या तांत्रिक बाबी आपण नंतर पाहू. तांत्रिक गोष्टींमध्ये पटकन शिरलो तर कदाचित आपली सफर बऱ्याच लोकांसाठी suffering होईल अशी भिती वाटते.

मला वाटतं ह्या संगीतप्रकाराविषयी सर्वांना आवड निर्माण होण्यासाठी आधी आपण काही रचनांचा प्रत्यक्ष आस्वाद घेऊ.

लिझ्ट नावाच्या एकोणिसाव्या शतकातल्या एका महान संगितकाराची "प्रेमस्वप्न क्रं. ३" नावाची रचना आजही जगभर लोकप्रिय आहे. त्याची लिंक पाठवत आहे. कृपया इअरफोन वापरून संगीत ऐका.

रचना ऐकल्यानंतर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील:

१. पियानोवादक पियानोतुन येणाऱ्या आवाजाचे नियंत्रण करून, आवाजात कमी जास्त अशी विविधता आणुन, गती कमी जास्त करत योग्य तो परिणाम साधतो.

२. भारतीय शास्त्रीय संगीतात जसे वादक काही नियम पाळून संगीत फुलवत (improvise करत) जाऊ शकतो, तसे पाश्चात्य अभिजात संगीतात घडत नाही. रचनाकाराने तपशीलवार दिलेल्या सुचना तो तंतोतंत पाळतो.

३. प्रेमाचे स्वप्न हळुवारपणे सुरु होते. मग त्यात प्रचंड उत्कटता येते. शेवटी स्वप्न हळुवारपणे विरून जाते.

4. हा रशियातला जगप्रसिद्ध पियानोवादक किसिन् उत्कृष्ट दर्जाचा कलाकार आहे. हा अापल्या सफरीमध्ये पुन्हा भेटण्याची शक्यता आहे.

ही रचना तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो.

https://youtu.be/XsxDH4HcOWA

🔺मेलडी आणि हार्मनी

भारतीय आणि पाश्चात्त्य अभिजात संगीतातला सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे आपलं संगीत मेलडी प्रधान आहे तर त्यांचं हार्मनी प्रधान.

आपण दोन्हीतला नेमका फरक जाणून घेऊ. आपण एखादं गाणं गात असू किंवा आपण शीळ घालत असू तर एका वेळी संगीतातला एकच स्वर ऐकू येईल. जसजसं संगीत पुढं जाईल तसतसं आपण वेगवेगळे स्वर आपण ऐकू. पण कुठल्याही क्षणी आपल्याला एकच स्वर आपल्याला ऐकू येईल. समजा गाण्याचे स्वर सा-रे-प-ध-नि-नि असे काहीतरी आहेत, तर आपल्याला कुठलाही एक स्वर उदा. रे ऐकताना दुसरा स्वर उदा. सा किंवा नि ऐकू येणार नाही.

याच्याविरुद्ध जेव्हा आपण एकाच वेळी बरेचसे सूर ऐकू येतात आणि ते बदलत राहतात तेंव्हा ती हार्मनी बनते. उदा. मी प गात असताना कुणीतरी ग आणि अजून कुणीतरी सा गात असेल आणि त्यानंतर मी आणि माझ्या बरोबर गाणारे स्वर बदलत गेले तर ती हार्मनी बनते. अर्थातच ह्या हार्मनीचे बरेचशे क्लिष्ट नियम असतात जे पाळले नाहीत तर संगीत मधुर बनत नाही.

आपण आता ऐकुया बरोक कालखंडातील (सर्वसाधारण १६०० - १७५०) महान संगीतकार बाख याची ‘एअर ऑन द जी स्ट्रिंग’ ही रचना. या रचनेत तुम्हाला एका पेक्षा जास्त स्वर सतत स्पष्टपणे ऐकू येतील.
https://www.youtube.com/watch?v=pzlw6fUux4o

अभिजित शिंदे:- Blues पण क्लासिकल मध्ये मोडत का?

दुष्यंत पाटील :-नाही.ब्लूज हा संगीतप्रकार पाश्चिमात्य अभिजात संगीतात मोडत नाही.

अाफ्रिकेतून अमेरिकेत गेलेल्या गुलाम मंडळींनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ह्या संगीताची सुरुवात केली. ह्या संगीतात अाफ्रिकन पारंपारिक संगीताचा गंध आहे. आफ्रीकेतल्या उत्तर नायजेरीया, उत्तर घाना वगैरे प्रदेशात ह्या संगीताची मुळं सापडतात असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. अर्थात तिथं स्थायिक झालेल्या गोऱ्या लोकांच्या लोकसंगीताचेही सावट ब्लूजवर आहेत.

ह्या संगिताचं खास वैशिष्ट म्हणजे गायनातल्या येणारे ब्लू स्वर. ब्लू स्वरांना चिंतेचे स्वर असेही म्हणतात. हे स्वर कोणते? समजा सातही स्वर शुद्ध असणारा थाट आपण घेतला अाणि त्यातले फक्त ग,प (अाणि कधीकधी नि) आपण कोमल केला, तर कोमल झालेल्या स्वरांना ब्लू स्वर म्हणतात. (आपल्या संगीतात प कोमल होत नाही याची मला कल्पना आहे, पण ते लोक पाचवा स्वर कोमल करताना दाखवतात म्हणून मी कल्पना मांडली).

मी अमेरिकन संगीताविषयीची बराचसा गोष्टी वाचल्या आहेत, पण फारसे संगीत ऐकलेले नाही.

पेटीत अाणि पियानोमधला  एक फरक म्हणजे dynamics. पियानोच्या कीवर जितक्या वेगानं तुमचं बोट पडतं तितक्या वेगानं अातला हातोड्यासारखा असणारा भाग तारांवर आदळतो. ह्यामुळं वेग नियंत्रीत करून एकाच सुराच्या कित्येक छटा पियानोमधुन काढणं शक्य असतं. खरंतर एखाद्या पियानोवादकाची खरी प्रतिभा सुरांच्या वेगवेगळ्या छटांचा वापर करून योग्य तो परिणाम साधण्यात असते. त्यामुळं ह्या छटांकडं लक्ष देणं खुप महत्वाचं ठरतं.

खुप साऱ्या संगीताकारांचं  सगळंच संगीत स्मरणात लक्षात ठेवणं शक्य नसतं. त्यामुळं जगप्रसिद्ध पियानोवादकही आपल्याला कधी कधी वाचत वाचत वाजवताना दिसतात. उदा. Sviatoslav Richter हा विकीपेडियाप्रमाणं "known for the depth of his interpretations, his virtuoso technique and his vast repertoire. He is generally regarded as one of the greatest pianists of the 20th century."

आपल्याला तो ह्या व्हिडीओमध्ये वाचत वाचत वाजवताना दिसतोय.

https://youtu.be/FZeGjnrlCNk

लेखन:-दुष्यंन्त पाटील

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मैफल

माझी आवडती गाणी

माझी आवडती गाणी

🔺गीतांजली देगावकर

माझे आवडते गाणे- 'या चिमण्यांनो परत फिरा रे'
    काही वर्षांपूर्वीची घटना आहे ही. मी त्यावेळी साखरशाळेचे काम करत होते. मांजरी येथे काम सुरू होते. संध्याकाळी मुले धावत आली आणि फुरसुंगी फाट्यावर शालेय बसला रेल्वेने धडक दिली आणि अनेक मुले त्यात गेली असे रडत सांगितले. त्यातील काही जणांनी ते पाहिले होते. ती मुले सांगत असताना शेजारच्या घरातून 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गाणे ऐकू येत होते. त्याच दिवशी विशेष गीतगंगा या कार्यक्रमात अरुण सरनाईक यांनी या मुलांसाठी हेच गाणे समर्पित केले.

🔺दीप्ती पुजारी

तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे

कॉलेजमध्ये असताना ऐकलं तेव्हा जाणवली एखाद्या नवथर प्रेयसीची मिलनासाठीची उत्कटता आणि तिला छळणारी तिच्या प्रियाची अलिप्तता. गाणं तेव्हा एकदम रोमँटिक वाटलं होतं. खूपदा ऐकलं, पुन्हा पुन्हा भारावून जाऊन ऐकलं, तेव्हा जाणवलं, की ही फक्त प्रणयोत्सुक प्रियेने तिच्या प्रियकराला केलेली आळवणी नाही. ह्या गण्यातच, सुरावटीत एक दर्द आहे, ती तिच्या आयुष्याचीच विफलता सांगतेय. आज अलिप्त असलेला प्रियकर परत कधीच प्रेमाने जवळ येणार नाही अशी खात्री आणि त्यामुळे दुःखी असलेली प्रेयसी दिसली.
नंतर कधीतरी कुठेतरी वाचलं, की हे गाणं भटांनी अर्ध्यावर संसार सोडून परलोकांच्या यात्रेला निघालेल्या आपल्या प्रियासाठी त्याच्या कलेवरासमोर असलेल्या प्रियेला कल्पून लिहिलं आहे.
सर्रकन काटाच आला अंगावर. इतकं आर्त दुःख. सुरावटींची जादू अशी की मला अर्थ ठाऊक नसतानाही हे दुःख जाणवत आलं होतं.

🔺दुष्यंत पाटील

माझं अावडतं मराठी गाणं

माझं आवडतं गाणं म्हणजे 'अगबाई अरेच्चा' चित्रपटातलं 'दुर्गे दुर्घट भारी'..

तसं बघायला गेलं तर आपण सगळेचजण लहानपणापासून ऐकत आलेली ही देवीची आरती आहे.. पण या गाण्यातल्या एक दोन गोष्टी मला खुप भावतात.. मला आठवतयं चित्रपट पाहताना पहिल्यांदाच हे गाणं ऐकल्या ऐकल्या मी ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो.. कित्येक वेळा डोळे मिटून हे गाणं ऐकलं तरी वेड लागल्यासारखं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटायचं..👌👌

पहिली गोष्ट म्हणजे अजय-अतुल यांचं संगीत.. वेगळ्या पट्टीकडं नेणारा कोरस वेड लावतो.. काहीतरी न सांगता येण्यासारखा अनुभव देतो..

दुसरी गोष्ट म्हणजे ह्या गाण्याचं चित्रीकरण. गाण्यातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातले विचार आपोआपच ऐकू येत असतात.. दुसऱ्याच्या वेदना न बोलून दाखवताच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, आणि त्या समजल्यावर संवेदनशील माणसाची प्रतिक्रिया ह्या गाण्यात खुप सुंदर प्रकारे काही ठिकाणी दाखवली आहे..

अजूनही अधुनमधुन मी हे गाणं ऐकत असतो.. अजूनही हे गाणं मला तितकंच वेड लावतं

🔺सचिन फडणवीस

'तरुण आहे रात्र अजुनी' हे मृत्यू गीत आहे असे म्हणणाऱ्या प्रतिभावंत समीक्षकाला सलाम !!
सुरेश भटांना मी प्रत्यक्ष घरगुती मैफलीत बसून ऐकलय,
'मेल्यावरी जगाचे आभार मानले मी,' ही गझल लिहून झाल्यावर दुसर्याच दिवशी माझ्या मावस बहिणीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी भट साहेब गप्पा ठोकायला वसंत नगर ला, नागपुरात सदाशिव कुलकर्णी यांच्याकडे आले असताना मी ऐकलीय. तिसरीत होतो, 'तोतयाला सुद्धा अवतार मानले मी' ही तेंव्हा न उमगलेली पण अजूनही मनात रेंगाळत असलेली ओळ आजही आठवते. तुम्ही माझा चहाचा कप रिता होऊ देऊ नका, मी मैफिल सुनी होऊ देत नाही ही काय ती त्यांची एकमेव अट होती.
असो, मराठीत in your face असलेली जी मोजकी शृंगार गीते आहेत, त्यातलं हे एक अप्रतिम गाणं, गझल आहे. भट आयुष्याला भिडून जगणारा मोकळा ढाकळा कवि माणूस!!
एका अभिसारिकेच्या अत्यंत शारीर पण तितक्याच मादक आणि आर्जवी श्रुंगाराची व्यथा, आर्तता, व्याकुळता, नैराश्य या गझलेत आहे. वाचताना कदाचित आवडणार नाही, पण प्रेमाची अभिव्यक्ती देहिक शृंगाराचा हात धरून व्यक्त होऊ पाहते तेंव्हा आपल्या प्रियकराची अनासक्ती किती जीव घेणी असते, त्याच हे प्रकटन आहे. आजवर पुरुषाला आर्जव करावे लागते, प्रेयसीला खुलवत खुलवत या काठावर आणावे लागते, कड्यावरून एकाच वेळी दोघानीही स्वताला झोकून द्यायला म्हणून!! इथे, तिला त्याचा देह हवा आहे, तिला 'नव्या स्वपनांच्या अनोळखी प्रदेशात' त्याच बोट धरून ते अवथर जग explore करायचं आहे, आणि म्हणून अचानक विरागी वृत्तीने शांत झालेल्या प्रियकराला हे आर्जव आहे, आव्हान आहे, प्रश्न आहेत, दिशा आहे..

या गाण्यातल्या कितीतरी जागा जीवघेण्या आहेत...
'सांग या कोजागिरीच्या' या एकाच ओळीत मध्य लईतून चांदण्याला गाताना जो आशाताईंनी जलवा दाखवला आहे तो गजब आहे. सहज म्हणून गुणगुणत असताना प्रत्येक जण ही जागा घेतो, आणि तरी नेहमी अतृप्त, अस्वस्थ असतो ती जागा साधत नाही म्हणून...

प्रत्येक कडव्यात आशाताईंच्या गळ्याची ताकद, त्याची पोच, त्याचा अवखळ मादक शृंगार, आणि तरीही अत्यंत सोज्वळ स्वरांची गुंफण याचा एक अद्भुत अविष्कार हे गाणे आहे...
आता मला थांबायला हवे...

🔺संजय गावडे

मी प्राथमिक शाळेत असताना शाळेच्या बाईंनी  आम्हाला " नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा... सत्यम शिवम सुंदरा...हे गाणं शिकवलेलं... पहिल्यांदाच हे गाणं मी बाईंच्या तोंडून ऐकलं ...पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं... त्यावेळी गाणं म्हणजे काय? काव्य म्हणजे काय? हे काहीही माहित नसताना मला ते कमालीचं आवडलं.... आणि त्यानंतर हजारो गाणी ऐकली...आवडली.... शेकडो शास्त्रीय संगीताच्या मैफीली  ऐकल्या...पण हे केदार रागावर आधारित गाणं अजूनही मनात घर करून आहे... मोठा झाल्यावर याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर....याचं उत्तर...या सुंदर अशा प्रार्थनेचे शब्द आणि संगीतकार राम कदम यांनी यासाठी निवडलेला  राग केदार....हे गाणं ऐकल्यावर केदार रागाचं स्वरुप स्पष्ट होतं...केदार रागातिल मुख्यांग ठळकपणे दिसून येतं..... आणि उत्तरा केळकर यांनी ते उत्तमरीत्या गायलं आहे....याच रागातिल गुड्डी हिंदी चित्रपटातील हमको मनकी शक्ती देना ही पण प्रार्थना फार लोकप्रिय आहे.

🔺निवेदिता खांडेकर

माझं आवडतं गाणं... *ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ... भेटीत तुष्टता मोठी*

रोजची सकाळ आकाशवाणी मुख्य व विविध भारती ही दोन्ही स्टेशन्स ऐकतच व्हायची. बहुदा समज नव्हती तेव्हा पासून अनेकदा हे गाणं ऐकते आहे आणि आजकाल तर यु ट्यूब मुळे मूड आला की ऐक असं सुरू असतं.

गाण्यात उल्लेखल्या प्रमाणे या नाट्य गीताचा आणि माझा काही ऋणानुबंध नक्कीच आहे. एकतर कुमारजींचा त्या गाण्यातला आवाज एकदम महान गायकाचा न वाटता humane वाटला. (हा त्यांचा देवासला shift झाल्यानंतरचा, जरा किनरा आणि कधीकधी shrill वाटणारा आवाज). दुसरं. त्याच भावनेचं manifestation त्यांनी ज्या प्रकारे *ध* *स* *फु* *स* *लो* म्हंटलं ते वाटतं. आणि एक अजून. माझी आजी कधीच 'जन्म' न म्हणता नेहमी 'जल्म'म्हणायची. या गाण्यात अगदी तसाच उच्चार कुमारजी करतात. खरं तर ही कारणंच. गाणं आवडलं ते मुळातच गायकी (कडव्यांच्या मधल्या ताना .. आहाहा ...), शब्द, अर्थ आणि संगीताची भट्टी मस्त जमली म्हणून.

तर हे असं आवडलेलं गाण दरवेळी ऐकलं की नव्यानी झिरपत झिरपत जात आणि कधी चुकून एखादा spot सापडतो की वाटून जातं ... अरेच्चा.. हे इतक्यांदा आधी ऐकलं तेव्हा का नाही समजलं. उदा. तिसऱ्या कडव्याची सुरूवात होते ... "कधि जवळ सुखाने बसलो, दुःखात सुखाला हसलो ... ". एकदिवशी ऐकू आलं / वाटलं कुमारजी 'जवळ' न म्हणता 'रवळ' म्हणताहेत. ते तसं का म्हंटलं या विषयी मी अजून तरी काही ऐकलं नाही. (कलापिनी दीदीला विचारायला हवं). एकदा वाटलं, कुमारजी 'तृष्टता'न म्हणता 'तुष्टता' म्हणताहेत.

अविट शब्दाला सार्थ करणारं गीत मला विचारलं तर हेच. कितीदाही ऐका. 'कितीदा आलो, गेलो, रमलो' ते जसं म्हणतात ... तसंच ... कितीदा ऐको. *अ* *वि* *ट*.

सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मैफल